VIDEO : बिहार विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ, विधानसभा अध्यक्षांनाच कोंडून घालण्याचा प्रयत्न, महिला आमदारांना फरफटत नेले बाहेर

बिहार विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांना कामकाजासाठी येऊच द्यायचं नाही, असा चंग बांधून विरोधी पक्षातील महिला आमदारांनी त्यांना घेराव घातल चेंबरमध्येच कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना पाचारण करण्यात आलं. सुरक्षा पथकातील महिला सुरक्षा रक्षकांनी पुढाकार घेत गोंधळ घालणाऱ्या या महिला आमदारांना अक्षरशः फरफटत बाहेर काढलं. यावेळी अभूतपूर्व अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

    बिहार विधानसभेत अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अधिरमधवेशन सुरू असताना काही महिला आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या चेंबरमध्येच कोंडून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी या महिला विधानसभा अध्यक्षांच्या केबिनपर्यंत पोहोचल्या आणि त्यांना बाहेर येण्यास मज्जाव करू लागल्या.

    बिहार विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांना कामकाजासाठी येऊच द्यायचं नाही, असा चंग बांधून विरोधी पक्षातील महिला आमदारांनी त्यांना घेराव घातल चेंबरमध्येच कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना पाचारण करण्यात आलं. सुरक्षा पथकातील महिला सुरक्षा रक्षकांनी पुढाकार घेत गोंधळ घालणाऱ्या या महिला आमदारांना अक्षरशः फरफटत बाहेर काढलं. यावेळी अभूतपूर्व अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

    बिहार सरकारच्या प्रस्तावित शस्त्रास्त्र कायद्याला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतलाय. सरकार बहुमताच्या जोरावर हा कायदा मंजूर करून घेत असल्यामुळे विधानसभेचं कामकाजच होऊ न देण्याचा निर्णय घेत त्यांनी विधानसभा अध्यक्षांना त्यांच्याच चेंबरमध्ये कोंडून ठेवण्याचा आणि तिथून बाहेरच पडू न देण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. लोकशाही प्रक्रियेत अशा प्रकारे कुणाला कोंडून ठेऊन कामकाज रोखणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी दिलीय.

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील या घटनेचा निषेध केलाय. ज्या गोष्टींना विरोधकांचा आक्षेप असेल, त्यांनी सभागृहात आपले मुद्दे मांडावेत. शस्त्रास्त्र कायद्याला असलेला विरोध त्यांनी पटलावर नोंदवावा. मात्र असे प्रकार लोकशाहीसाठी घातक असल्याची प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिलीय.