ओंकारेश्वर धरणावर उभारणार जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प

ओंकारेश्वर धरण हे नर्मदा नदीवर बांधले आहे. हा आमचा जलविद्युत प्रकल्प आहे आणि यामध्ये आम्ही पाण्यापासून ऊर्जा निर्माण करतो. तसेच, हा जलविद्युत प्रकल्प सुमारे १०० चौरस किलोमीटरमध्ये पसरले आहे. या भागातील पाण्याच्या पातळीत होणारा बदल जास्त नाही आणि त्यामुळे ते योग्य ठिकाण आहे, असे दुबे यांनी सांगितले.

    भोपाळ : मध्य प्रदेश राज्याची वीजनिर्मिती (Power Generation) क्षमता वाढवण्यासह त्या भागातील विजेच्या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने खंडवा (Khandwa) येथे तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प (Floating Solar Power Plant) उभारण्यात येणार आहे. जो २०२२-२३ पर्यंत ६०० मेगावॅट वीजनिर्मिती करेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर प्लांट (World’s Largest Floating Solar Plant) म्हणून ओळखल्या जाणार्‍या या प्रकल्पाची किंमत ३००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

    ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव संजय दुबे (Sanjay Dubey) यांनी सांगितले की, ओंकारेश्वर धरण (Omkareshwar Dam) हे नर्मदा नदीवर (Narmada River) बांधले आहे. हा आमचा जलविद्युत प्रकल्प आहे आणि यामध्ये आम्ही पाण्यापासून ऊर्जा निर्माण करतो. तसेच, हा जलविद्युत प्रकल्प सुमारे १०० चौरस किलोमीटरमध्ये पसरले आहे.

    दुबे यांनी असेही सांगितले की, या भागातील पाण्याच्या पातळीत होणारा बदल जास्त नाही आणि त्यामुळे ते योग्य ठिकाण आहे. नवीन फ्लोटिंग सोलर प्लांटमुळे खंडवा हा मध्य प्रदेशातील औष्णिक ऊर्जा केंद्र, जलविद्युत आणि सौर ऊर्जा असणारा एकमेव जिल्हा बनणार आहे. पुढील टप्प्यात आम्ही आणखी ३०० मेगावॅटसाठी निविदा मागवल्या असल्याने हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प असेल ज्याला फ्लोटिंग सोलर म्हटले जाईल, असेही दुबे म्हणाले.