दोनपेक्षा अधिक मुलं असतील तर… लोकसंख्या नियंत्रणासाठी योगी सरकारचा जबरदस्त प्लान

लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर उत्तर प्रदेशात विचारविनिमय सुरू झाला आहे. यासाठी राज्याचा विधी आयोग मसूदा तयार करीत असून या मसुद्यानुसार दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या पालकांची सब्सिडी बंद करणे तसेच सरकारी योजनांमध्ये कपात करण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते. राज्याचे विधि आयोगाचे अध्यक्ष आदित्यनाथ मित्तल यांनी रविारी देशातील वाढत्या लोकसंख्येव चिंता व्यक्त केली व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचेही संकेत दिले.

  लखनौ : लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर उत्तर प्रदेशात विचारविनिमय सुरू झाला आहे. यासाठी राज्याचा विधी आयोग मसूदा तयार करीत असून या मसुद्यानुसार दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या पालकांची सब्सिडी बंद करणे तसेच सरकारी योजनांमध्ये कपात करण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते. राज्याचे विधि आयोगाचे अध्यक्ष आदित्यनाथ मित्तल यांनी रविारी देशातील वाढत्या लोकसंख्येव चिंता व्यक्त केली व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचेही संकेत दिले.

  समस्याही वाढल्या

  वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्याही निर्माण होत आहेत. रुग्णालय, खाद्यान्न आणि घर तसेच रोजगाराच्या अन्य समस्याही उत्पन्न होत आहेत त्यामुळेच या समस्येवर नियंत्रण मिळविण्याची गरज असल्याचे मित्तल म्हणाले. लोकसंख्या नियंत्रण कुटुंब नियोजनापेक्षा वेगळे आहे, असेही ते म्हणाले.

  मानवाधिकारास विरोध नाही

  दरम्यान, आमचे मत एका विशिष्ट समाजासाठी नसून अथवा नागरिकांच्या मानवाधिकारांनाही आम्ही आव्हान देत नाही, असेही मित्तल यांनी स्पष्ट केले. सरकारी संसाधन आणि सुविधा त्या लोकांसाठी उपलब्ध व्हाव्यात जे लोकसंख्या नियंत्रणात मदत करतात त्या लोकांना योजनांचा लाभ व्हावा, हाच उद्देश असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी 10 जून रोजी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनीही गरीबी कमी करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण आ‌वश्यक असल्याचे म्हटले होते. सरमा यांनी यासंदर्भात राज्यात कठोर कायदाही करणार असल्याचे सूतोवाच केले होते.

  हे सुद्धा वाचा