बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, ११ जण जखमी

बस आणि कंटेनर यांच्यातील रस्ते अपघातात ११ प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात काल गुरूवारी सायंकाळी ७च्या सुमारास झाला. यातील ६ जखमींवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून ५ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

वाडा : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड पाली -विक्रमगड रस्त्यावरील वाकडुपाडा या ठिकाणी बस आणि कंटेनर यांच्यातील रस्ते अपघातात ११ प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात काल गुरूवारी सायंकाळी ७च्या सुमारास झाला. यातील ६ जखमींवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून ५ जण गंभीररित्या जखमी झाले आहे. त्यांना ठाणे येथे हलविण्यात आले आहे.जखमी मध्ये २स्त्रिया व ३पुरुष असल्याचे रुग्णालयाकडून माहिती देण्यात आली. ही बस राज्य परिवहन महामंडळ जव्हार वाडा बस होती.

पालघर मधील पाली विक्रमगड या रस्त्यावर वाकडू पाडा या ठिकाणी वाडा जव्हार बस आणि कंटेनर यांच्यात सायंकाळी ७ च्या सुमारास अपघात झाला.या अपघात ११ प्रवाशी जखमी झाले. या अपघातामुळे या रस्त्यावरची वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.