आई ओरडल्याचा त्याला आला राग अन् उचललं टोकाचं पाऊल, बारा वर्षाच्या मुलाच्या आत्महत्येने उडाली खळबळ

एक आई आपल्या बारा वर्षीय मुलावर तो अभ्यास करत नव्हता म्हणून ओरडली. यानंतर मुलानं रागात टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या (12 Year Old Student Commits Suicide) केली.

    वसई : वसईमधील (Vasai) माणिकपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील समर्थ रामदास नगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी संध्याकाळी याठिकाणी एक आई आपल्या बारा वर्षीय मुलावर तो अभ्यास करत नव्हता म्हणून ओरडली. यानंतर मुलानं रागात टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या (12 Year Old Student Commits Suicide) केली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    समर्थ रामदास नगर स्थित ईस्टव्हिव अपार्टमेंटमध्ये शुभम शिव प्रसाद आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. तो पाचवीमध्ये शिकत होता आणि एकुलता एक मुलगा होता. सोमवारी संध्याकाळी आईनं त्याला अभ्यासावरुन ओरडलं असता त्याला या गोष्टीचा राग आला. काही वेळातच शुभमनं बेडरुममधील पंख्याला फाशी घेतली (Minor Commits Suicide). घटनेची माहिची मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

    शुभमच्या आत्महत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याआधीही वसईत लहान मुलांच्या आत्महत्येच्या घटना समोर आल्या आहेत. यात अनेकांनी क्षुल्लक कारणावरुन टोकाचं पाऊल उचललं आहे.