वसई विरार महापालिकेची लसीकरणामध्ये आघाडी, आत्तापर्यंत इतक्या लोकांना देण्यात आला डोस

वसई विरार शहर महानगरपालिका(vasai virar corporation) हद्दीत कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्सना लसीकरण सुरु करण्यात आल्यानंतर शासन निर्देशानुसार १ मार्च २०२१ पासून ६० वर्षावरील व्यक्ती व ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे.

  वसई: वसई-विरार महापालिकेकडून(vasai virar corporation) आत्तापर्यंत २५ हजार ७७३ लोकांना कोरोनावरील लसीचा डोस(vaccination in vasai virar) देण्यात आला आहे.

  वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्सना लसीकरण सुरु करण्यात आल्यानंतर शासन निर्देशानुसार १ मार्च २०२१ पासून ६० वर्षावरील व्यक्ती व ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे.

  या लसीकरणासाठी पालिकेने वरुण इंडस्ट्रीज, वालीव येथील लसीकरण केंद्रासोबतच महानगरपालिकेचे निश्चित केलेले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये व शासनाने निश्चित केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरण केले जात आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, ९ मार्च २०२१ पर्यंत सर्व लसीकरण केंद्रांमध्ये मिळून एकूण २५७७३ लसींचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या पहिल्या डोसची संख्या ७७०९ व दुसऱ्या डोसची संख्या ४६८९ आहे. फ्रंटलाईन वर्कर्सना देण्यात आलेल्या पहिल्या डोसची संख्या ६३४८ असून ३२२ फ्रंटलाईन वर्कर्सनी दुसरा डोस घेतला आहे.

  यासोबतच ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेल्या १००१ व्यक्तींना व ६० वर्षावरील ५७०४ व्यक्तींना कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. कोव्हीड-१९ प्रतिबंधक लस ही अत्यंत सुरक्षित असून लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येत आहे.

  लसीकरण केंद्रावर येणाऱ्यांनी केंद्रावर गर्दी न करता एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवावे व मास्क परिधान करावे असे आवाहन वसई विरार महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.