२४ तासांत पालघर जिल्ह्यात ३४५ नव्या रुग्णांची नोंद

पालघर : २४ तासांत जिल्ह्यात ३४५ इतक्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्ण संख्येनं ३४ हजारांचा टप्पा पार केला असून जिल्ह्यातली कोव्हिड-१९ च्या रुग्णांची संख्या आता ३४ हजार १६७ वर पोहचली आहे. त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या २१ हजार ९४३ इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या १२ हजार २२४ इतक्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर आतापर्यंत २९ हजार ७५२ इतके रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितित पालघर ग्रामीण भागात ६१२ इतकी प्रतिबंधित क्षेत्रं आहेत.