students in school

शाळा(schools) सुरू झाल्याने कोरोना(corona to students) वाढण्याची भीती खरी व्हायला लागली आहे.जव्हार तालुक्यातीलJawhar) कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. विनवळ आश्रमशाळेतील ३७ मुले, ३ शिक्षक व आदिवासी विकास विभागाचे विनवळ येथील सेंट्रल किचनचे १६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत.

    संदीप साळवे, जव्हार: अनेक महिन्यांपासून जव्हार(jawhar) तालुक्यात कोरोना नियंत्रणात(corona) होता. मात्र गेल्या आठवड्यात अचानक हा संसर्गजन्य आजार प्रचंड बळावला आहे. टाळेबंदीत सर्व काही बंद होते परंतु राज्य शासनाने कोरोना कमी झाल्यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता शाळेमध्येही विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

    शिक्षण क्षेत्रात काम करणारे अनेक कर्मचारी हे राज्यातील भिन्न भागात राहात होते. शाळा सुरू झाल्याने कोरोना वाढण्याची भीती खरी व्हायला लागली आहे.जव्हार तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. विनवळ आश्रमशाळेतील ३७ मुले, ३ शिक्षक व आदिवासी विकास विभागाचे विनवळ येथील सेंट्रल किचनचे १६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. तसेच नगर परिषद हद्दीतील ९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्यामुळे जव्हार तालुक्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

    जव्हार तालुक्यातील सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याने नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. कोणत्याही अफवेला बळी पडण्यापूर्वी आरोग्य विभागाकडून शहानिशा करावी.सी सी सी सेंटर सुरू करण्यात आले असून, जव्हार येथील कोविड सेंटरही सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळा.मास्क वापरा. लग्न समारंभ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरका जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

    डॉ. किरण पाटील, जव्हार तालुका आरोग्य अधिकारी

    मागच्या आठड्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार येथील विनवळ आश्रमशाळेतील श्रीशक्ति संस्थेचे सेंट्रल किचन येथील १६ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या रुग्णांना किरकोळ लक्षणे असून यातील काही रूग्णांना विक्रमगड येथील रिव्हेरा या कोविड केंद्रात हलविण्यात आले आहे.

    जव्हार शहरातील नागरिकांनी आरोग्य विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात या आजाराबाबत कोणतीही लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेतल्यास सर्वांच्या हिताचे ठरणार आहे.

    - दीपक भिसे ,सामाजिक कार्यकर्ते,जव्हार

    दरम्यान ३ ,४ दिवसांपूर्वी हिरडपाडा येथील अनुदानित आश्रमशाळेतील दहावी ते बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेले ९ विद्यार्थी ताप, सर्दी, खोकला येत असल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र जामसर येथे तपासणीसाठी आणण्यात आले होते. एकाच शाळेतील ९ विद्यार्थ्यांना एकाच वेळी ताप, सर्दी, खोकला येत असल्याने, डॉक्टरांना संशय आला. त्यांची तेथे अँटिजेन तपासणी केली असता नऊ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले.

    हे धक्कादायक वास्तव समोर आल्यावर तातडीने आश्रमशाळेतील विद्यार्थी व हिरडपाडा गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यात शाळेतील २८ विद्यार्थी, ३ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.हिरडपाडा शाळेतील एकूण ३७ विद्यार्थी व ३ कर्मचारी असे ४० रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.

    आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना किरकोळ लक्षणे आहेत. त्यांना जव्हारच्या मुलींचे वसतिगृह येथील सी. सी. सी. सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहेत. तसेच आजपर्यंत ७२ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.