40% water loss in Tarapur MID; The ban on tanker transport has also affected the chemical mafia
Glimpses of the Unit III dome and the project site of Tarapur Atomic Power Project (TAPP) near Mumbai.

पालघर : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार तारापूर एमआयडीसी मध्ये चाळीस टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. दीड ते दोन वर्षापूर्वी हा आदेश काढल्यानंतर ही  कंपन्याना अतिरिक्त लागणारे पाणी अनधिकृतपणे टॅंकरने घेण्यात येत होते. या पाण्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ यांनी ५ डिसेंबर २०२० ते २ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत टँकर वाहतुकीचे बंदी आदेश जारी केले आहेत. यामुळे केमिकल माफियांचे धाबे दणाणले आहेत.

राष्ट्रीय हरित लवादाने काढलेल्या या आदेशाला कारखानदारांनी केराची टोपली दाखवली असून उद्योजक टँकरद्वारे कंपनी उत्पादना साठीबेकायदेशीर पणे पाणी विकत घेत असल्यामुळे सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर याचा दबाव वाढत आहे.सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता ही २५ एमएलडी असून ४० ते ४५ एमएलडी पर्यंत सांडपाणी हे तिथे येते  होते.

अतिरिक्त पाणी हे कोणतीही प्रक्रिया न करता सोडू नये म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. तरीही एवढे सांडपाणी कसे काय येऊ शकते असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत.

तारापुर एमआयडीसीतील काही उद्योगांमधून तसेच बाहेरून आणि परराज्यातून टँकरमधून घातक रासायनिक सांडपाणी तारापूर व परिसरात आणून सोडले जाते याचा त्रासा बरोबरच आजूबाजूचे पर्यावरणावर त्यांच्या प्रदूषणाचा दुष्परिणाम होत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांसोबत ११ नोव्हेंबरला झालेल्या सभेत या गोष्टीवर प्रकाश टाकला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून टॅंकर वर बंदी घातली आहे.

बंदीचा आदेश दिल्याबरोबर ५ डिसेंबर २०२०ते २ फेब्रुवारी २०२१पर्यंत टँकर वाहतूक सुरू असेल त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले असून वाहतूक होऊ नये म्हणून दक्षता पथके नेमून पोलिसांनाही लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे येथील उद्योगधंद्यांना लगाम बसला असून यातुन अग्निशमन दलाची वाहने वगळण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत पाण्याचे टॅंकरना एमआयडीसीच्या लेखी परवानगीने वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे.

पाणी कपात नंतर उत्पादन प्रक्रियेसाठी टॅंकरद्वारे अतिरिक्त पाणी बेकायदा येत असल्याने २५ एमएलडी  क्षमतेपेक्षा जास्त सांडपाणी येऊ लागल्याने अतिरिक्त सांडपाणी प्रक्रियेविना नवापूर ते समुद्रात सोडले जात असल्याने त्याचे दुष्परिणाम मासेमारी शेती आरोग्यावर होऊ लागल्यामुळे अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादाकडे दावा दाखल करून लढा सुरू केला आहे.या लवादाच्या दिल्ली खंडपीठाने तारापूर व परिसरातील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आदेश दिले आहेत.