पालघर नगरपरिषद क्षेत्रात ५ दिवस संपूर्ण लॉकडाउन, अत्यावश्यक सेवा राहणार सुरु

पालघर जिल्ह्यातल्या पालघर नगरपरिषद क्षेत्रात आतापर्यंत कोरोना विषाणु संसर्गामुळे ४४२ रुग्ण बाधित झाले आहेत. आणि या कार्यक्षेत्रातले निकट सहवासीत जास्त प्रमाणात बाधित झाल्याचं आढ़ळून आल्यानं हा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेता, कोरोना विषाणुचा संसर्ग जास्त वाढू नये, म्हणून पालघर नगरपरिषद क्षेत्रात १४ ऑगस्ट पासून ते १८ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे.

पालघर :  राज्य शासनानं कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्च पासून लागु करून खंड २,३, आणि ४ मधल्या तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातल्या नागरिकांची ये जा प्रतिबंधित करणं आवश्यक असल्यानं, उपोद् घातातील ए अ.क्र. ६ नुसार पालघर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाण मनाई आदेश ३१ ऑगस्ट पर्यंत निर्गमित करण्यात आला आहे.

तर पालघर जिल्ह्यातल्या पालघर नगरपरिषद क्षेत्रात आतापर्यंत कोरोना विषाणु संसर्गामुळे ४४२ रुग्ण बाधित झाले आहेत. आणि या कार्यक्षेत्रातले निकट सहवासीत जास्त प्रमाणात बाधित झाल्याचं आढ़ळून आल्यानं हा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेता, कोरोना विषाणुचा संसर्ग जास्त वाढू नये, म्हणून पालघर नगरपरिषद क्षेत्रात १४ ऑगस्ट पासून ते १८ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे.

या काळात मेडिकल, डेअरी, अत्यावश्यक सेवेतील वाहनं आणि केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी पेट्रोल डिझेल, कारखाने  वगळता सर्व दुकानं, होटल्स, सर्व कारखाने, मासळी बाजार, उघड्यावरील बाजार आदी बंद असणार आहे. तसचं या क्षेत्रात अत्यावश्यक सेवा  आणि बैंकांनी टोकन पद्धतीचा अवलंब करून सुरु राहतील. तर भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी या आदेशातुन सवलत राहणार आहे.

या ठिकाणी सर्व संबधितांना आदेशापुर्वी नोटीस बजावनं शक्य नसल्यानं हां आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. या आदेशाचा भंग केल्यास संबंधिता विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० मधील तरतुदीनुसार आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार करवाई करण्यात येईल.