वाडा तालुक्यात ५ दिवसाचा जनता कफ्यू

  •  शहरासह तालुक्यातिल मोठी बाजारपेठ, कुडूस ही कडकडी बंद

वाडा. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कोरोना थैमान घातले आहे व कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. हे गांभीर्य लक्षात घेत हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील व आमदार शांताराम मोरे यांनी कोरोनाची साखळी तोडण्याकरिता ९ सप्टेंबर रोजी शासकिय विश्रामगृह वाडा येथे तालुक्याचे तहसीलदार उद्धव कदम, तालुक्याचे पोलिस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी,आरोग्य विभागाचे अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकाऱयांसमवेत,सर्वपक्षीय व व्यापारी संघटना वाडा यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वसंमतीने निर्णय घेत दि. १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर असा जनता कर्फ्यू घोषित केला. या बैठकीत कोरोना काळात पहिल्यांदाच सर्वपक्षीय निर्णय घेण्यात आल्याने हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी स्वागत केले. त्यानुसार आज शनिवार दि.१२ पासुन ५ दिवस वाडा तालुक्यात जनता कफ्यू ला सुरवात झाली व वाडा शहरासह तालुक्यातिल सर्वात मोठी बाजारपेठ  कुडूस सह शिरीषपाडा, कंचाड, गोर्हे, आबिटघर या बाजारपेठेला ही कडकडीत बंदचा प्रतिसाद मिळाला.

आजपासून सुरू झालेल्या जनता कर्प्यु ला वाडा नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी त्याच बरोबर व्यापारी संघटनांनी दिलेल्या पाठीब्यांमुळे चांगला प्रतिसाद मिळत असून कोरोनाच्या या लढाईत वाडा शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची बाब ठरत आहे , त्यासाठी सर्व व्यापारी बांधवांचे, त्याच बरोबर जनता कर्प्युला सहकार्य करणारया स्वयंसेवकाचे वाडा शहराच्या प्रथम नागरिक या नात्याने आभार व्यक्त करते , पुढील जनता कर्प्यु च्या काळात सुद्धा अशाप्रकारे प्रतिसाद देऊन सर्वाच्या सहकार्याने जनता कर्प्यु यशस्वी करावा असे आवाहन करत आहे

गीतांजली गजानन कोलेकर , नगराध्यक्षा, नगरपंचायत, वाडा

 

जोपर्यंत कोरोना वर लस येत नाही तोपर्यंत कोरोनाबाबत शासन प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन केले तर संक्रमण साखळी वाढणार नाही व ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन अथवा जनता कर्फ्यु सारखे उपाय करण्याची गरज पडणार नाही*

- विशाल मोहन मुकणे, स्थानिक नागरिक, वाडा.

लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान तर होतेच पण अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होत असतो तरीही सार्वजनिक आरोग्य सर्वात जास्त महत्वाचे असल्याने वाडा शहरात वाढत चाललेली संक्रमण साखळी तोडण्यासाठी आयोजित केलेल्या जनता कर्फ्यु ला सहकार्य करण्याची भूमिका व्यापारी संघाने घेतली आहे. यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कोणी पालन करत नसेल तर त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी

प्रफुल पाटील अध्यक्ष - वाडा शहर व्यापारी संघटना