पालघर येथील विकासकाच्या मुलाच्या लग्नासाठी(marriage of developer`s son in jaipur) दोनशेहून अधिक वर्‍हाडी मंडळी जयपूरला ८ आणि ९ तारखेला एका पंचतारांकित हॉटेलला वास्तव्यास होती. १० तारखेला ही मंडळी पालघर येथे आली त्यानंतर बऱ्याचशा मंडळींनी पालघर आणि परिसरात वावरल्यामुळे शहरात कोरोना संसर्ग वाढणार का ? असा प्रश्न उपस्थित होतो.

  पालघर: जयपूरचे लग्न(jaipur marriage) पालघरकरांना(palghar) चांगलेच महागात पडले असून कोरोना संसर्गाने पालघरचे उपनगराध्यक्ष गटनेते नगरसेवक आणि इतर मंडळींना ग्रासले असून लोकप्रतिनिधीच शासनाने आखून दिलेले नियम पायदळी तुडवत असतील तर सर्वसामान्य वरच्या लग्न समारंभावर कारवाईचा बडगा का?असा प्रश्न पालघरवासीय उपस्थित करीत आहेत.

  कोरोनाच्या पहिला लाटे दरम्यान कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अर्थात जोकिंग संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी सक्तीने घेऊन जात असे .पालघर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी १४ व १५ मार्च रोजी जयपूरवरून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश दिले असताना १८० ते २४० प्रवाशांपैकी फक्त ८३ नागरिकांनी तपासणी केली होती. सर्वसामान्य नागरिकांवर नियमांचा धाक दाखवणाऱ्या प्रशासनाने बलाढ्य व्यवसायिकांसमोर शरणागती पत्करली अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

  पालघर नगर परिषदेतील नगरसेवक नगर परिषद कार्यालयात जाऊन आल्याने बऱ्याच लोकांच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण नगरपरिषद इमारत कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याने कार्यालयांतील कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण आहे. यासंबंधी कर्मचारी उघडपणे बोलायला घाबरत असल्याचे चित्र दिसत आहे.

  नगर परिषदेतील कर्मचार्‍यांचीही तपासणी होणे गरजेचे आहे. कारण पालघर शहरातील नागरिक आपल्या वैयक्तिक कामासाठी नगरपालिकेत जात असतात. त्यामुळे या संसर्गाचा प्रसार जलद गतीने पालघरमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी कोरोना झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना या अगोदर जबरदस्तीने चाचणी करून घेण्याची सक्ती प्रशासनाकडून होत असताना आता प्रशासन गप्प का आहे. धनदांडग्यांना वेगळा न्याय का? अशी चर्चा पालघरमध्ये आहे.

  पालघर येथील विकासकाच्या मुलाच्या लग्नासाठी दोनशेहून अधिक वर्‍हाडी मंडळी जयपूरला ८ आणि ९ तारखेला एका पंचतारांकित हॉटेलला वास्तव्यास होती. १० तारखेला ही मंडळी पालघर येथे आली त्यानंतर बऱ्याचशा मंडळींनी पालघर आणि परिसरात वावरल्यामुळे शहरात कोरोना संसर्ग वाढणार का ? असा प्रश्न उपस्थित होतो.

  या लग्न समारंभासाठी पालघर परिसरातील राजकीय नेते, वकील, डॉक्टर, व्यवसायिक, उद्योजक सरकारी अधिकारी मोठ्या प्रमाणात गेले होते. मध्यंतरी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अचानकपणे लग्न समारंभात धाडी टाकून नियम मोडणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून दंडही ठोठावले होते.मात्र या वऱ्हाडाच्या बाबतीत नरमाईचे धोरण अवलंबल्याचे दिसत आहे.