राइस मीलमध्ये सापडला ८ फूट लांब आणि १७ किलो वजनाचा अजगर

भाताच्या गोणीत लपून बसलेला ८ फूट आणि वजन १७ कीलो ग्रॅम वजनाचा अजगर आढळला.

वाडा : पालघर मधील ढेकाले गावातील एका राईस मील मधे भाताच्या गोणीत लपून बसलेला ८ फूट आणि वजन १७ कीलो ग्रॅम वजनाचा अजगर आढळला. या अजगराला सर्प मित्र प्रणित विटणकर आणि गणेश धांगडा यांनी सुरक्षितेने आणि मोठ्या शिताफतीने पकडला आणि  त्याला जंगलात सोडून दिले. या दोन सर्पमित्रांनी सर्प प्रजातीना वाचविण्याचे काम काही वर्षांपासून करीत आहे.