पालघरमध्ये आज सकाळी ३.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा तिसरा धक्का

तलासरी: पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे आज सकाळी ८.०७ मिनिटांनी डहाणू तलासरी भागात ३.५ या रिश्टर स्केलचा धक्का बसला आहे. मागील दोन दिवसांपासून हे भूकंपाचे सत्र सुरू आहे. धुंदलवाडी परिसरात २१ गावांना या मागील ४.० रिश्टर स्केलचा मोठा धक्का बसला. या भूकंपाच्या धक्क्यात ४ घरांचे मोठे नुकसान झाले. आज पुन्हा या भागात भूकंपाचा धक्का बसला आहे.

त्यामुळे या डहाणू तलासरी भागातील लोकांच्या मनात सतत भूकंप होत असल्यामुळे भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने डहाणू तलासरी भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. भूकंपासारख्या या नैसर्गिक आपत्तीमुळे डहाणू तलासरी भागातील ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झालेले आहे त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.