A van driver who came to pay at an ATM absconded with Rs 4.5 crore

व्हॅन एटीएम केंद्राजवळ उभी असताना सुरक्षा रक्षक आणि मदतनीस एटीएम मशीन उघडण्यात व्यस्त होते, तर व्हॅनचा चालक व्हॅनसह फरार झाला. सहाय्यक पोलिस आयुक्त रेणुका बागडे यांनी सांगितले की व्हॅनमध्ये ४.२५ कोटींची रोकड आहे. महिंद्रा बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार : विरारमधील (shocking incident in Virar)  एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी आलेल्या व्हॅनचा चालक साडेचार कोटी ( Rs 4.5 crore) रुपये रोख घेऊन फरार झाला. ( ATM van driver absconded )ही घटना गुरुवारी संध्याकाळी विरारच्या बोळिंजमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेच्या बोळिंज भागात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता बँकेचे वाहन कोटक महिंद्र बँकेच्या एटीएमवर रोकड भरण्यासाठी आले. यात दोन सुरक्षा रक्षक आणि एक सहाय्यक होते. व्हॅन एटीएम केंद्राजवळ उभी असताना सुरक्षा रक्षक आणि मदतनीस एटीएम मशीन उघडण्यात व्यस्त होते, तर व्हॅनचा चालक व्हॅनसह फरार झाला. सहाय्यक पोलिस आयुक्त रेणुका बागडे यांनी सांगितले की व्हॅनमध्ये ४.२५ कोटींची रोकड आहे. महिंद्रा बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीसांचे पथक त्याचा शोध घेत आहे.

गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कोटक महिंद्राच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी ही व्हॅन आली होती. त्यावेळी चालकाने व्हॅन पळवून नेण्याचा प्रकार घडला. हा दरोड्याचा प्रकार नसून चोरीची घटना आहे. या व्हॅनच्या शोधासाठी तीन पथक तयार करण्यात आले आहे. कसून तपास सुरू आहे, अशी माहिती, पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली.