विनापरवाना रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

एकूण ७,९०,००,३५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खनिवडे तसचं खार्डी इथल्या तानसा/ वैतरणा नदीच्या पात्रात काही लोक विनापरवाना रेती उत्खनन करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तानसा नदी किनारी खार्डी इथं छापा टाकला असता रेती उत्खनन करणाऱ्यांना याची चाहूल लागताच ते तिथुन पळून गेले. खार्डी इथून पोलिसांनी ७४,०९,२५० रुपये किंमतीची ७५० ब्रास रेती, १५,००,००० रुपये किंमतीचा १ जेसेबी, १,६०,००,००० रुपये किंमतीच्या अवैध रेती वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ८० बोटी, ५०,००,००० रुपये किंमतीचे ५० सक्शन पंप असा २,९९,०९,२५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

तर तानसा/वैतरणा नदी किनारी खनिवडे इथं छापा टाकला असता तिथून ८३,९७,१५० रुपये किंमतीचा ८५० ब्रास गौणखनिज रेती माल, १,०२,००,००० रुपये किंमतीचे १२० सक्शन पंप, ३,००,००,००० रुपये किंमतीच्या अवैध रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १५० बोटी, ४,९३,९५० रुपये किंमतीचा अंदाजे ५० ब्रास साठा ४,९०,९१,१०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय.

खार्डी आणि खनिवडे या दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी एकूण ७,९०,००,३५०रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.यात अज्ञात आरोपीं विरोधात विरार पोलीस ठाण्यात कलम ३७९, ३४ प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.