bajaj healthcare

तारापूर एमआयडीसीतील(tarapur midc) बजाज हेल्थकेअर(bajaj healthcare) या कारखान्यातून गडद हिरव्या रंगाचे घातक रासायनिक सांडपाणी(chemical waste water) पॉझिटिव्ह रिचार्ज पाईपलाईनमधून एमआयडीसी चेंबरमध्ये सोडण्याऐवजी छुप्या पद्धतीने टाकलेल्या ग्रॅव्हिटी पाईपलाईनद्वारे रात्रीच्या वेळेस सोडले जात होते.

पालघर : तारापूर एमआयडीसीतील(tarapur midc) बजाज हेल्थकेअर(bajaj healthcare) या कारखान्यातून गडद हिरव्या रंगाचे घातक रासायनिक सांडपाणी(chemical waste water) पॉझिटिव्ह रिचार्ज पाईपलाईनमधून एमआयडीसी चेंबरमध्ये सोडण्याऐवजी छुप्या पद्धतीने टाकलेल्या ग्रॅव्हिटी पाईपलाईनद्वारे रात्रीच्या वेळेस सोडले जात होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ(maharashtra pollution control board) आणि सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सीईटीपीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला हे सांडपाणी सोडताना रंगेहाथ पकडले.

तारापूर येथील प्लॉट नंबर एन -१७८ मधील या कारखान्यातून रासायनिक सांडपाणी सोडत असल्याची घटना समोर आली. याबाबत कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे तारापूर येथील उपप्रादेशिक कार्यालयातून पाठविण्यात आलेला आहे. मात्र प्रादेशिक कार्यालयातून रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडणाऱ्या बजाज हेल्थ केअर या अति प्रदुषणकारी कारखान्यास रंगेहाथ प्रदूषण नियंत्रण मंडळाने पकडले असले तरी याच कारखान्यांचे अजून चार कारखाने या अगोदरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केले आहेत. तर राष्ट्रीय हरित लवादाने कोट्यवधी रुपयांची दंड येथील कारखान्यांवर थोटावला असला तरी तारापूर मधील प्रदूषण बेसुमार सुरूच आहे.

चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

- राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ , ठाणे विभाग

रासायनिक कारखान्यातून छुप्या पध्दतीने घातक रसायन कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सोडले जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर संयुक्तपणे रात्रीच्या वेळी कारखान्याची तपासणी सुरू केली होती. मात्र कारवाईला १५ दिवस उलटून गेले असताना देखील प्रादेशिक कार्यालय ठाणे यांच्या कडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे बजाज हेल्थ केअर कारखान्याला मोकळीक कोणत्या दबावामुळे दिली जाते असा प्रश्न उपस्थित केला जात असून कारवाई करण्यास चालढकल होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.