साधू हत्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्यावर कारवाई

या प्रकरणी तत्कालीन प्रभारी आनंदराव काळे यांना बडतर्फ तर उपनिरीक्षक रवी साळुंखे आणि पोलिस कॉन्स्टेबल नरेश धोडी यांना सक्तीची सेवानिवृत्त देण्यात आली आहे. कोकण विभागीय कार्यालय यांच्या कडून ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली.

वाडा : पालघर जिल्ह्यातील साधू हत्या प्रकरणात तत्कालीन कासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक आनंद काळे यांना बडतर्फ करण्यात आले. तर या प्रकरणात याआधी ३५ पोलीस कर्मचारी बदल्या आणि तत्कालीन पालघर पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते.

आता या प्रकरणी तत्कालीन प्रभारी आनंदराव काळे यांना बडतर्फ तर उपनिरीक्षक रवी साळुंखे आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली आहे. कोकण विभागीय कार्यालय यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचलेत १६ एप्रिल २०२० रोजीच्या साधू हत्याकांडात मुंबईहून सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. हत्या प्रकरणाचा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणी सुरुवातीला कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर. बी. साळुंखे व दोन कॉन्स्टेबल यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. तर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्याचप्रमाणे प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आल्या. या प्रकरणात २८ आरोपींवर आरोपपत्र दाखल न झाल्याने त्यांना जामीन मिळाला होता.

१६९ जणांवर सीआयडीने दोन गुन्ह्यात ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यात १२० अधिक आरोपींवर चार्जशीट दाखल केली होती. गुन्हे अन्वेषण विभागाने या तपासाची चार्जशीट दाखल केल्या नंतर या तपासाचा निष्कर्ष हा केवळ अफवेने या प्रकरणात दोन साधू आणि त्यांचा चालक यांचा जमवाकडून हत्या झाली होती. असे चार्ज शिट कोर्टात दाखल झाल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वक्तव्य केले होते.

बडतर्फ, सक्तीची सेवा निवृत्ती आणि मूळ वेतन श्रेणीतील वेतनावर ठेवले

या प्रकरणात तत्कालीन पोलीस उप निरीक्षक साळुंखे यांना व पोलिस हवालदार संतोष मुकणे यांना आपल्या पदाच्या मूळ वेतनश्रेणीतील मूळ वेतनावर २ वर्ष ठेवणे तर ३ पोलिस शिपायांना १ वर्ष आणि १० पोलीस शिपायांना आपल्या पदाच्या वेतनश्रेणी तील मूळ वेतनावर ३ वर्ष ठेवण्याची शिक्षा करण्यात आली आहे.
या गडचिंचले साधू हत्या प्रकरणात पोलिसांनी केलेली कुचराई म्हणून कासा पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकारी वर्गासहित १८ पोलीस कर्मचारीवर्ग यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.