adivasi huts

पालघर जिल्ह्यातील(aplghar district) आदिवासी कुटुंबे(adivasi families) रोजगाराच्या(employment) शोधात पालघर जिल्ह्याच्या शहरी भागात व जिल्ह्याबाहेरील शहरी भागांमध्ये विसावताना दिसत आहेत. डोक्यावर तांदळाची गोण, कमरेवर कपड्याचे ओझे व कुटुंबातील स्त्रीच्या हातात लाकडाची मोळी व दहा भांड्यांचा संसार घेऊन स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांची परिस्थिती आजही दीनवाणीच आहे.

  संतोष चुरी, पालघर: पालघर(palghar) जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे जिल्ह्यातील जव्हार,विक्रमगड,मोखाडा आदी दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबे आपल्या पोराबाळांसह रोजगाराच्या शोधात शहरांकडे काम शोधण्यासाठी स्थलांतर(migration in cities) करताना दिसत आहेत. दरवर्षी ही कुटुंबे पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत असल्याचे भयाण वास्तव कायम आहे. मात्र ही वास्तविकता आजही प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याने ही कुटुंबे उपेक्षितच आहेत.

  जिल्ह्यातील ही आदिवासी कुटुंबे रोजगाराच्या शोधात पालघर जिल्ह्याच्या शहरी भागात व जिल्ह्याबाहेरील शहरी भागांमध्ये विसावताना दिसत आहेत. डोक्यावर तांदळाची गोण, कमरेवर कपड्याचे ओझे व कुटुंबातील स्त्रीच्या हातात लाकडाची मोळी व दहा भांड्यांचा संसार घेऊन स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांची परिस्थिती आजही दीनवाणीच आहे.

  कुटुंबासह शहरात स्थलांतर झाल्यानंतर शहरातील निर्जन व निर्मनुष्य जमिनीवर आदिवासी कुटुंबे ताडपत्री,काठी ठेकुचे भोंगे बांधून राहत असल्याने आरोग्य शिक्षण व इतर बाबींपासून ते असुरक्षितच आहेत कुटुंबातील लहान मुलांना तर अंगणवाडीचीही सोय नाही त्यामुळे पोषण मिळणार कसे ? असा सवाल या आदिवासींना पुढे उपस्थित झाला आहे. याचबरोबरीने तेथे त्यांच्यासह त्यांच्या पोराबाळांची आरोग्याची काळजी घेणारे कोणी नसते. या ठिकाणी त्यांच्यावर आजार बळावण्याची शक्यता आहे. ते ज्या ठिकाणी राहत आहेत, त्या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणीही उपलब्ध नसते. त्यामुळे याचा त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. या मजूरवर्ग आदिवासी कुटुंबातील महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल कोणती जनजागृती नसल्याने त्यांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे

  adivasi hut photo

  स्थानिक पातळीवर हाताला काम नसल्याने आदिवासी कुटुंबांना स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पोराबाळांसह घरातल्या स्त्रिया व म्हातारे आई-वडील असा पूर्ण संसार घेऊन आदिवासी कुटुंबे शहरांकडे स्थलांतर करीत आहेत, हेच त्यांचे भीषण वास्तव आहे. गरिबी ही जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे.

  पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, वाडा, तलासरी या तालुक्यातील दुर्गम व आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेली आदिवासी कुटुंबे रोजगारासाठी वणवण करताना दिसत आहेत.ही कुटुंबे स्थलांतर करीत असल्याने गाव पाडे ओस पडू लागल्याचे चित्र आहे. कोरोनाकाळातून जनजीवन सुरळीत होत असले तरी या स्थलांतरित मजुरांच्या पोटपाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे.

  कामगार नाके गच्च भरत असले तरी निम्म्या हातांनाही कामे मिळण्याची शक्यता नाही. जी मजुरी मिळेल त्या मजुरीवर काम करणे या मजुरांना भाग पडत आहे. विविध मजुरी कामे करणाऱ्या आदिवासी कुटुंबासह परराज्यातील मजूरांची परवड होत असून दोन दोन दिवस मजुरीसाठी वणवण करावी लागल्याचे भयावह चित्र दिसत आहे.जिल्ह्यात मनरेगामधून रोजगार हमीची कामे मिळत असली तरी यातून मिळणारी मजुरी अल्प आहे . ती मजुरी वेळच्या वेळी मिळत नसल्याने याकडे ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबांचा कल कमी आहे.त्यामुळे कामाच्या शोधात अनेक कुटुंबे आपली गावे सोडून बाहेर पडत आहेत.त्यातच हाताला पुरेसे काम न मिळाल्याने त्यांची निराशा होत आहे. आता काम नसल्याने ही कुटुंबे उपासमारीत जीवन जगत आहेत.