दिर्घ विश्रांतीनंतर वसईतील उद्याने गजबजणार

कोरोनाच्या संकटात वसई तालुक्यातील सर्व उद्याने आठ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. लहान मुलांसह जेष्ठ नागरिक घरातच अडकून पडले होते.त्यांच्यावर मानसिक तणाव जाणवू लागला होता.आपल्या हद्दितील सर्व उद्याने पालिकेने खुली केल्यामुळे त्यांना आता दिलासा मिळणार आहे.

वसई : दिर्घ विश्रांतीनंतर वसई तालुक्यातील (vasai district) सर्व उद्याने खुली करण्यात आली असून,त्यांच्या नुतणीकरणाचे कामही पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या संकटात वसई तालुक्यातील सर्व उद्याने आठ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. लहान मुलांसह जेष्ठ नागरिक घरातच अडकून पडले होते.त्यांच्यावर मानसिक तणाव जाणवू लागला होता.आपल्या हद्दितील सर्व उद्याने पालिकेने खुली केल्यामुळे त्यांना आता दिलासा मिळणार आहे.

सकाळ आणि संध्याकाळी ही उद्याने सुरु असल्यामुळे जेष्ठांना चालण्याचा व्यायाम करता येत होता. तर गप्पा गोष्टी करण्यासाठी एक व्यासपिठही त्यांना उद्यानांच्या निमित्ताने मिळाले होते.त्यामुळे विरंगुळाही होत होता.तसेच त्यांची प्रकृती ठणठणीत ठेवण्यासही मदत होत होती. ही उद्याने लॉकडाउनच्या काळात बंद असल्यामुळे ते आठ महिने घरात अडकून पडले होते. शासनाच्या आदेशानुसार पालिकेने उद्याने खुली करण्यास सुरूवात केली आहे.

मात्र,दिर्घ काळापासून बंद असल्यामुळे या उद्यानातील खेळणी,व्यायामाचे साहित्य गंजलेल्या अवस्थेत आहेत. तोटाळेतलाव, सनशाईन, आचोळे तलाव, मोरेगांव तलाव, वृंदावन,नाना-नानी पार्क, महेश पार्क,मनवेलपाडा,पापडी,गाखिवरे,सातीवली,वालिव,धनीवबाग,बोळींज,छेडानगर,शांतीपाकई या उद्यानातील खेळणी तुटलेली आहेत.त्यांच्या दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले आहे.त्यामुळे येथील नागरिकांना वाट पहावी लागणार आहे.

उद्याने अद्यावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.तुटलेली खेळणी,व्यायामाचे साहित्य बदलून नव्याने बसवण्यात येणार आहे.त्यामुळे नागरिकांनी थोडी वाट पहावी लागणार आहे.

राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिका