patient died in rickshaw

पालघर जिल्ह्यातील ‘मेट्रो शहर’ म्हणून ओळख असणाऱ्या बोईसर शहरांमध्ये सरकारी रुग्णालयाबरोबर खाजगी रुग्णालयेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र एका सामान्य नागरिकाला उपचाराअभावी जीव(death in rickshaw) गमवावा लागला असल्याची दुर्दैवी घटना बोईसरमध्ये(death in boisar) घडली आहे.

  विनायक पवार, बोईसर: पालघर(palghar) जिल्ह्यात कोरोनाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. असे असताना आता बोईसर शहरात रुग्णांना उपचार न भेटल्याने त्याचा ऑटो रिक्षात मृत्यू झाल्याचा(patient death in auto rickshaw) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  पालघर जिल्ह्यातील ‘मेट्रो शहर’ म्हणून ओळख असणाऱ्या बोईसर शहरांमध्ये सरकारी रुग्णालयाबरोबर खाजगी रुग्णालयेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र एका सामान्य नागरिकाला उपचाराअभावी जीव गमवावा लागला असल्याची दुर्दैवी घटना बोईसरमध्ये घडली आहे.

  एक पत्नी आपल्या पतीला उपचार मिळावे म्हणून दिवसभर बोईसर शहरात फिरत होती. मात्र एकाही रुग्णालयात उपचार न मिळाल्याने अखेर त्यांनी रिक्षामध्येच आपले प्राण सोडले. यावरून बोईसरमध्ये ढासळलेली आरोग्य व्यवस्था व माणूसकी नसलेल्या रुग्णालयांची चित्रे नागरिकांना पाहण्यास मिळाली .

  बोईसर शहराच्या पूर्वेस दांडीपाडा राहणारे सिरंग गावडे (वय ५५ वर्षे) यांची शनिवारी २४ एप्रिल रोजी सकाळी श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी त्यांची पत्नी व मुलगा रिक्षातून घेवून बोईसर येथील वरद हॉस्पिटल, शिंदे हॉस्पिटल, चिन्मय हॉस्पिटल, तुंगा हॉस्पिटल अशा अनेक ठिकाणी जाऊन मृत व्यक्तीच्या पत्नीने व मुलाने रुग्णालयांना उपचार करण्यासाठी विनवणी करूनदेखील उपचारासाठी बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून उपचार करण्यास नकार देण्यात आला.

  दुपारच्या दरम्यान त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेटेगाव येथील अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात आण्यात आले. मात्र त्याठिकाणीदेखील जागा उपलब्ध नसल्याने रिक्षातच ठेवलेल्या सिरंग गावडे यांचा त्याच ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला. आहे.

  बोईसर दांडी पाडा येथे राहणाऱ्या एका इसमाचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. अशी घटना परत बोईसरसह जिल्ह्यामध्ये कुठेही पुन्हा घडू नये व शासकीय रुग्णालये व खाजगी रुग्णालयांनी माणुसकी जपून तरी रुग्णावर कोरोना संकटाच्या काळात उपचार करून त्यांना मदत करावी.

  - अनिल रावते , पंचायत समिती सदस्य , दांडीपाडा, बोईसर (बहुजन विकास आघाडी)

  रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या रिक्षात गावडे यांचा मृतदेह जवळ पास तीन ते चार तास पडून होता. मात्र त्या ठिकाणी कोणतीही खाजगी अथवा शासकीय यंत्रणा पुढे आली नाही. आपल्या वडिलांचा व महिलेच्या पतीचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याने त्यांची पत्नी व मुलगा त्यांच्या बाजूला बसुन नि:शब्द होत आपले दुःख मनात ठेवुन आता तरी सरकारी यंत्रणा येऊन मदत करेल या आशेवर राहिले होते. मात्र रात्र होत गेली तरी कोणाचीही मदत न भेटल्याने मित्र परिवार आणि नातेवाईकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

  एका सामान्य माणसाचा उपचाराअभावी मृत्यू झाला असून आता तरी राजकीय नेते जागृत होतील का ? असा आक्रोश स्थानिक नागरिकानी मांडला आहे.