suraj pande saved snake

चक्रीवादळाच्या(Cyclone) तडाख्यात माणसांसह मुक्या जनावारांचेही(Animals) मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. सापांच्या बिळात पावसाचे पाणी शिरल्याने आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्यामुळे अनेक प्राणी व पक्षांची घरटी तुटली.

    वसई : तौक्ते चक्रीवादळाच्या(Cyclone Tauktae) तडाख्यात सापडलेल्या पन्नासहून अधिक वन्यजीवांची(Animals and birds saved) एका सर्पमित्राने सुटका करून त्यांना जंगलाच्या आश्रयाला पाठवले.  चक्रीवादळाच्या तडाख्यात माणसांसह मुक्या जनावारांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. सापांच्या बिळात पावसाचे पाणी शिरल्याने आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्यामुळे अनेक प्राणी व पक्षांची घरटी तुटली.त्यांनी आसऱ्यासाठी मानवी वस्तीत धाव घेतली.

    suraj pande

    सर्प मित्र सुरज पांडे या सर्प मित्राला याविषयी माहिती मिळाल्यावर त्याने वेगवेगळ्या परिसरातील मानवी वस्तीतून तब्बल ५० हून अधिक वेगवेगळ्या जातीचे विषारी व बिनविषारी साप व पक्षी यांना त्याने वाचवले आहे.

    सुरजने वाचवलेल्या प्राणी आणि पक्ष्यांमध्ये नाग, घोणस, हरीणटोळ अशा विविध जातींचे साप असून एक घुबड ,सरडा व काही पक्ष्यांचा समावेश आहे. सर्वच ठिकाणी पाणी साचले असल्याने अनेक साप बिळातून बाहेर पडत मानवी वस्तीत आडोसा घेत आहेत. त्यामुळे असे साप आढळल्यास त्यांना न मारता ही माहिती प्राणी मित्रांना त्यांचा जीव वाचवावा,असे आवाहन प्राणीप्रेमींमधून केले जात आहे.