palghar mob lynching

साधू हत्याकांड(Palghar Mob Lynching) (गडचिंचले झुंडबळी) प्रकरणात अटक(Arrest) झालेल्या आणखी चौदा जणांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात(Bail Granted To 14 Accused Of Palghar Mob Lynching Case) आला आहे.

    पालघर : पालघरमधील गडचिंचले येथील साधू हत्याकांड(Palghar Mob Lynching) (गडचिंचले झुंडबळी) प्रकरणात अटक(Arrest) झालेल्या आणखी चौदा जणांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात(Bail Granted To 14 Accused Of Palghar Mob Lynching Case) आला आहे. ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने याबाबतचा आदेश दिला आहे. तर दुसरीकडे इतर अठरा जणांचा जामीन अर्ज ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांच्या दालनात याप्रकरणी सुनावणी पार पडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, पालघर साधू हत्याकांडप्रकरणी एकूण 228 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ज्यामध्ये 12 आरोपींचे वय 18 वर्षाखालील होते. त्यामध्ये 75 जणांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. तर हत्येप्रकरणी 808 संशयितांची चौकशी करण्यात आली होती. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या 194 आरोपींना ठाणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला होता.

    यानंतर याप्रकरणी मंगळवारी जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. त्यावेळी आणखी 14 जणांचा जामीन मंजूर करण्यात आला. यामुळे जामीनावर सुटका झालेल्यांची संख्या 208 इतकी झाली आहे. तर इतर 18 जणांचा जामीन अर्ज ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंगळवारी नामंजूर केला आहे.

    दरम्यान या हत्या प्रकरणात महाराष्ट्र सीआयडीने डहाणू कोर्टात 11 हजार पानांचे दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात कोणतेही जातीय कारण नसून काही अफवा असल्याचा दावा सीआयडीने तपासणीत केला होता.

    कसं घडलं हे पालघर हत्याकांड ?

    पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरली.त्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. 16 एप्रिल रोजी रात्री उशिरा इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहन चालकासह तिघे जण होते. मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. नीट विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक केली.तसेच लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला

    पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत 101 जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.