tunga covid hospital

तुंगा या खाजगी कोविड रुग्णालयातील(Covid hospital) मॅनेजरला औषधाच्या बिलाच्या(Dispute over bill) रकमेतील वादावरून भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बोईसर (Boisar) येथे समोर आला आहे.

    बोईसर: तारापूर(Tarapur) औद्योगिक वसाहतीमधील टाकी नाका परिसरात असलेल्या प्रसिद्ध तुंगा या खाजगी कोविड रुग्णालयातील(Covid hospital) मॅनेजरला औषधाच्या बिलाच्या(Dispute over bill) रकमेतील वादावरून भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बोईसर (Boisar) येथे समोर आला आहे.

    या प्रकरणी बोईसर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई न केल्यास काम बंद आंदोलन पुढेही सुरु ठेवण्यात येईल, असा इशारा टिमा प्रशासन व कर्मचारी वर्गाकडून देण्यात आला आहे.

    तुंगा रुग्णालयात उपचार झालेल्या एका कोरोना रुग्णाच्या उपचारानंतर बिलाच्या देयकावरून वाद झाला. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी भाजपाच्या एका स्थानिक नेत्याला रुग्णालयात बोलवून बिलाची रक्कम कमी करण्याची मागणी करत असताना, यावेळी रुग्णालय प्रशासन व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने कार्यकर्त्यांकडून रुग्णालयातील संगणक व इतर साहित्याची मोडतोड केल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

    रुग्णालयाच्या इतर कर्मचाऱ्यांशी ठोशा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केला आहे. हा प्रकार सुरु असताना रुग्णालयातील ३५ कोरोणा रुग्णांवर उपचार सुरू असताना या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक करण्याची मागणी केली करत कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा इशारा दिला होता.

    मारहाण करणाऱ्या भाजपाचे स्थानिक नेते प्रशांत संखे याला बोईसर एमायडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर बोईसर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.