Dahanu-Blast

डहाणू तालुक्यातील(Dahanu) डेहणेपळे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट(Blast At Dahanu) झाला आहे.

    डहाणू : पालघरच्या(Palghar) डहाणू तालुक्यातील(Dahanu) देहने पले येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट(Blast At Dahanu) झाला आहे.या स्फोटामुळे डहाणू शहर पुरते हादरल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला.डहाणू तालुक्यातील डेहणे येथील विशाल फटाका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. डहाणू चारोटी मुख्य हायवेपासून १५ किमी अंतरावर जंगलात ही कंपनी आहे. अचानक झालेल्या स्फोटाने आजूबाजूचा १५ ते २० किलोमीटर अंतरावरील घरांना मोठे धक्के जाणवले आहे.

    स्फोटाच्या आगीमुळे धोराचे लोट २२ किलोमीटरपर्यंत दिसून येत आहेत.
    नेमका हा स्फोट कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप कळू शकली नाही. या घटनेत पोलीस सूत्रांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार ४ ते ते ५ लोक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

    घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून. स्थानिक पोलीस प्रशासन आणि गावकरी घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत वेल्डिंगचं काम सुरू होतं, त्याचदरम्यान आग लागल्याने हा स्फोट झाला आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.बचावकार्य सुरु झाले आहे.