tarapur blast

तारापूर (Tarapur)औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट जे-१ मधील कापडाचे उत्पादन करणाऱ्या जखारिया लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोट (Blast In Tarapur)झाला आहे.

    तारापूर : तारापूर (Tarapur)औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट जे-१ मधील कापडाचे उत्पादन करणाऱ्या जखारिया लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोट (Blast In Tarapur)झाला आहे. या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू(Death) झाला आहे. तसेच पाच कामगार(5 People Injured) जखमी झाले आहेत.जखमींवर बोईसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात एक मृतदेह हाती लागला असून शोध कार्य सुरू आहे.

    सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट घडला असून तीन ते चार किलोमीटर परिसरात स्फोटाचा मोठा आवाज ऐकू गेला आहे. त्यानंतर कंपनीमध्ये मोठी आग लागली. तारापूर अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी असून आग नियंत्रणात आली आहे.