भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट, ५ जण जखमी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश; जाणून घ्या सविस्तर

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेत अचानकपणे स्फोट झाल्यामुळे पाच जण जखमी झाले आहेत.

  पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात पाच कामगार जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. या सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आहे आहे.

  स्फोट झाल्यामुळे पाच जण जखमी

  मिळालेल्या माहितीनुसार तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेत अचानकपणे स्फोट झाल्यामुळे पाच जण जखमी झाले आहेत.

  आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश, ५ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार

  कारखान्यात आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियमंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून या घटनेत जखमी झालेल्या ५ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  blast in palghar bharat chemicals five workers injured