Body found under pile after 12 hours; Massive explosion at a textile company in Boisar

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जखारिया लिमिटेड या कापड टेक्सटाईल कंपनीत शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला आहे. स्फोटात कारखान्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर दुसरा बेपत्ता होता. त्याचा तब्बल १२ तासांनी ढिगाऱ्याखाली मृतदेह सापडला. मिथिलेश राजवंशी आणि छोटे लाल सरोज असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांचे नाव आहे. तर यात पाच जखमी झाले आहेत.

  बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जखारिया लिमिटेड या कापड टेक्सटाईल कंपनीत शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला आहे. स्फोटात कारखान्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर दुसरा बेपत्ता होता. त्याचा तब्बल १२ तासांनी ढिगाऱ्याखाली मृतदेह सापडला. मिथिलेश राजवंशी आणि छोटे लाल सरोज असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांचे नाव आहे. तर यात पाच जखमी झाले आहेत.

  टेक्सटाईल कारखान्यातील बॉयलरमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्फोटामुळे कारखान्याला लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने दोन तासांच्या अथक प्रयत्नाने नियंत्रण मिळविण्यात यश आले.

  तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जखरिया टेक्स्टाईल या कारखान्यात शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. स्फोटामुळे कारखान्याला आग लागली आहे. कारखान्याच्या बॉयलर शेजारी आठ कामगार काम करीत होते. स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून त्यातील एका कामगाराचा मृतदेह कारखान्यात आढळून आला आहे, तर छोटेलाल सरोज नामक कामगार बेपत्ता आहे. तर पाच कामगार जखमी झाले आहेत, त्यांच्यावर बोईसर मधील स्टार लाईफ लाईन या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  सकाळी स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.कारखान्यात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.स्फोटाच्या आवाजाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला आहे. गणेश विजय पाटील,अरविंद यादव, मुरली गौतम, अमित यादव, मुकेश यादव, उमेश राजवंशी अशी जखमींची नावे आहेत.

  बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये होणाऱ्या वेळोवेळी कारखान्यांच्या अपघातामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आसल्याने असे अपघात होत आहेत.

  - अजित संखे, अध्यक्ष, लेबर हेल्प फाउंडेशन

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]