बोगस डॉक्टरांचा वसई तालुक्यात सुळसुळाट, परवानगी नसताना होमिओपॅथिक डॉक्टरने घातले टाके आणि पुढे काय झालं ते वाचाच

मजुरी करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणार्‍या सदाबच्या हाताच्या अंगठ्याला दोन महिन्यांपुर्वी दुखापत झाली होती.त्यावेळी ते जवळच्या डॉ.ए.के.श्रीवास्तव यांच्याकडे गेले.तिथे श्रीवास्तव (bogus doctor of vasai)यांनी सदाबच्या जखमेवर टाके घातले.त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांच्या जखमेतून जास्त वेदना झाल्यामुळे सदाब पुन्हा श्रीवास्तव यांच्याकडे गेले असता,त्यांचा दवाखाना बंद होता.त्यामुळे सदाब संजीवनी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी गेले.तिथे डॉ.श्रीवास्तवच्या उपचाराचा भयानक प्रकार उघडकीस आला.

  रविंद्र माने, वसई : कोणतीही परवानगी नसताना होमिओपॅथिक डॉक्टरने(homeopathy doctor ) एका रुग्णाच्या जखमेवर टाके घालून त्याच्या हाताची शीर बंद केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. प्रहार जनशक्तीने आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करून आपली लाज वाचवली आहे.

  विरार पुर्वेकडील कारगील नगरमध्ये राहणार्‍या सदाब अन्सारी यांच्या बाबतीत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. मजुरी करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणार्‍या सदाबच्या हाताच्या अंगठ्याला दोन महिन्यांपुर्वी दुखापत झाली होती.त्यावेळी ते जवळच्या डॉ.ए.के.श्रीवास्तव यांच्याकडे गेले.तिथे श्रीवास्तव यांनी सदाबच्या जखमेवर टाके घातले.त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांच्या जखमेतून जास्त वेदना झाल्यामुळे सदाब पुन्हा श्रीवास्तव यांच्याकडे गेले असता,त्यांचा दवाखाना बंद होता.त्यामुळे सदाब संजीवनी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी गेले.तिथे डॉ.श्रीवास्तवच्या उपचाराचा भयानक प्रकार उघडकीस आला.

  सदाबचे हातावर पोट आहे. मजुरी करून चौघांचा उदरनिर्वाह करतो.पैसे कमावण्यासाठी रुग्णांच्या जीवाशी बोगस डॉक्टर खेळत असल्याचे हे एक मोठे उदाहरण आहे.अंगठ्याच्या इजेमुळे तीन महिने तो घरी होता. त्यातच उपचाराचा खर्च झाल्यामुळे उसनवार करण्याची पाळी सदाबवर आली आहे.

  -जतिन वालकर,जिल्हा प्रवर्तक,प्रहार संघटना

  संजीवनीत सदाबच्या जखमेचा एक्स-रे काढला असता,श्रीवास्तवने घातलेल्या टाक्याने अंगठ्याची नस बंद केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांचा अंगठा वाचवण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करून नस मोकळी करण्यात आली. हा प्रकार कळल्यावर सदाब यांनी अधिक माहिती घेतली असता,श्रीवास्तव हे होमिओपॅथीक(बीएचएमएस) डॉक्टर असून,ते त्यांना जखमेवर टाके घालणे,शस्त्रक्रिया करण्यास परवानगी नसल्याचे समजले.त्यामुळे त्यांनी प्रहार जनशक्ती जिल्हा प्रवक्ता तथा रुग्णसेवक जतीन वालकर यांच्यामार्फत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली.वालकर यांनीही सातत्याने दोन महिने महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा वाळके,डॉ.राजेंद्र चव्हाण आणि उपायुक्त डॉ.किशोर गवस यांच्याकडे वारंवार तक्रार करून पाठपुरावा केला. तरीदेखील श्रीवास्तव यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

  डॉ.श्रीवास्तववर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

  - डॉ.किशोर गवस, उपायुक्त वसई-विरार महापालिका

  यामुळे सदाब पत्नी सुहानासह वाळके आणि चव्हाण यांच्या विरोधात बुधवारी उपोषणाला बसले.त्याआधी या आंदोलनाचे पत्र त्यांनी महापालिकेला दिले होते.त्यामुळे सारवासरव करत पालिकेने डॉ.श्रीवास्तवच्या दवाखान्याला नोटीस बजावली.तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलीसांना दिले. तशी माहिती पोलीसांनी सदाब यांना आंदोलनाच्या ठिकाणी दिल्यावर त्यांनी आंदोलन मागे घेतले.सदाब यांनी वेळीच धाव घेवून संजीवनी रुग्णालय गाठले. तिथल्या डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून शस्त्रक्रिया केली.अन्यथा सदाबचा अंगठा कायमचा निकामी झाला असता.