police collecting fine

पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी विनामास्क (50 thosand fine collected from people not wearing masks)फिरणाऱ्या ३० नागरिकांवर एका दिवसात कारवाई करून जवळपास ५० हजार रुपयांची रक्कम वसूल केली आहे.

  बोईसर: कोरोना संख्येच्या लाटेला आळा घालण्यासाठी मास्क(Mask) घालणे बंधनकारक केले असून या नियमांचे उल्लंघन कोणी करत असेल तर पोलिसांना अशा लोकांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश राज्या सरकारकडून देण्यात दिले आहेत.

  पालघर जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु होताच, नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. मात्र काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. लॉकडाऊन लागल्यापासून तर पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाया रोज सुरु असून आत्तापर्यंत लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. तरी लोक अद्यापही बोईसर शहरात बेफिकीरपणे वागताना दिसून येत आहेत.

  पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी विनामास्क (50 thosand fine collected from people not wearing masks)फिरणाऱ्या ३० नागरिकांवर एका दिवसात कारवाई करून जवळपास ५० हजार रुपयांची रक्कम वसूल केली आहे. बोईसर स्टेशनच्या हद्दीमधील विविध ठिकाणी नाकाबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांकडूनही दंड वसूल करण्यात येत आहेत.

  सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव बघता नागरिकांनी नियमांचे पालन करणे अभिप्रेत आहे,अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

  बोईसर शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कसुन चौकशी करून त्या चौकशीमध्ये सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाताना योग्य कागदपत्रे असतील तरच त्या नागरिकांस सोडले जात आहे.

  राज्यात लॉकडाऊन सुरु असून जिल्यातील प्रशासनाने या काळात खबरदारी म्हणून जमावबंदी घोषित केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार कोरोना नियमांची त्रिसुत्री पाळण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोना संदर्भात जनजागृती करुनही काही नागरिक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. तोंडावरील मास्क लावणे टाळत असून कोरोना नियमांची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले आहे.