carol singing

कोरोनाच्या(corona) प्रभावामुळे यंदा पहिल्यांदाच कॅरल सिंगींग(carol singing) आणि चर्चमधील(church misa) रात्रीचा मिसा बंद करण्यात आली असून,त्याऐवजी संध्याकाळी मिसा होणार आहे.

वसई : कोरोनाच्या(corona) प्रभावामुळे यंदा पहिल्यांदाच कॅरल सिंगींग(carol singing) आणि चर्चमधील(church misa) रात्रीचा मिसा बंद करण्यात आली असून,त्याऐवजी संध्याकाळी मिसा होणार आहे.

दरवर्षी २४ डिसेंबरला रात्री १० वाजता चर्चमध्ये मिसा होत होता.त्यानंतर मध्यरात्री १२ वाजल्यावर २५ डिसेंबरचा नाताळ सण एकमेकांना शुभेच्छा देवून साजरा केला जात होता.यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे रात्रीचा मिसा रद्द करण्यात आला असून,त्याऐवजी संध्याकाळी ७ वाजता चर्चेसमध्ये मिसा होणार आहे.या मिसेला चर्चेसच्या क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यात १० वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील लोकांना मज्जाव करण्यात येणार आहे.

नाताळच्या आगमनाचा संदेश देणारी आणि वातावरण निर्मिती करणारी कॅरल सिंगीग म्हणजे नाताळ गीते यंदा होणार नाहीत.बॅन्ड पथकातील तरुण मंडळी गावात,आळीत,पाड्यांमध्ये जावून येशुच्या आगमनाची बातमी गीतांद्वारे सादर करीत असतात.कॅरल सिंगींगच्या या कार्यक्रमात पारंपारिक वेशभुषा करून मुले-मुली येशुच्या जन्माची गौरवगीते, स्तुती करणारी गीते गाऊन,प्रभु येशुचे आगमन होणार आहे,तयारीला लागा असे सांगत फिरत असतात. याला कॅरल सिंगीग म्हटले जाते.या कॅरलमुळे वसईच्या पश्‍चिम पट्ट्यात वातावरण निर्मीती होवून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होत होते.

डिसेंबरच्या पहिल्या रविवारपासून नाताळच्या आगमनाला सुरवात होते.या काळाला एडव्हेट काळ म्हणतात.या काळाचे पहिले तीन आठवडे पुनरागमनाचे असताता.तिसर्‍या आठवड्यापासून आगमन काळाला सुरवात होते.१७ ते २५ डिसेंबर या ९ दिवसांचा आगमन काळ असतो.या काळात कॅरल सिंगींग होत असते.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चमध्ये होणारे कॅरल सिंगींग रद्द करण्यात आले आहे.कॅरल सिंगिंगच्या पथकांनीही चर्च मागोमाग आपापले कार्यक्रम रद्द केले आहेत.कॅरल सिंगींग करणारी वसईत २५ पथके आहेत.या पथकात प्रत्येकी किमान १५ जण आहेत.कोरोनाचे भय अद्यापही संपले नसल्यामुळे या पथकातीस सदस्यांची संख्या चारवर आली आहे. इतक्या कमी संख्येने कॅरल करता येणार नसल्यामुळे ते रद्द करण्यात आले आहे.त्यामुळे गावागावांमध्ये गाणी,बॅन्ड पथक,तरुण-तरुणींचा उत्साह यंदा दिसून येणार नाही.

कॅरल सिंगींगच्या पथकातील सदस्य संख्या कोरोनामुळे कमी झाली आहे. इतक्या कमी संख्येत कॅरल सिंगींग करता येत नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कॅरल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. -मेल्वीन डाबरे,पथक प्रमुख

मिडनाईट मिसेऐवजी संध्याकाळी ७ ची मिसा होणार आहे.त्याला गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.-फादर मायकल जी