नोकरीतील पदोन्नतीच्या आरक्षणासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे धरणे आंदोलन

महाराष्ट्रातील जवळपास ४० हजार मागासवर्गीय कर्मचारी गेल्या ३ वर्षापासून पदोन्नतीपासून वंचित आहेत. न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून देशातील इतर राज्यांनी पदोन्नतीचे आरक्षण दिलेले आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने २९ डिसेंबर २०१७ पासून पदोन्नतीला स्थगिती दिलेली आहे. तेव्हापासून आजतागायत पदोन्नती व नोकरीतील आरक्षण हे विषय रखडले आहेत.

वाडा – नोकरीतील पदोन्नतीसाठी सोमवार दिनांक १७ ऑगस्ट २०२० रोजी राज्यभर सोशल मिडीयाच्या माध्यमाने धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील जवळपास ४० हजार मागासवर्गीय कर्मचारी गेल्या ३ वर्षापासून पदोन्नतीपासून वंचित आहेत. न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून देशातील इतर राज्यांनी पदोन्नतीचे आरक्षण दिलेले आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने २९ डिसेंबर २०१७ पासून पदोन्नतीला स्थगिती दिलेली आहे. तेव्हापासून आजतागायत पदोन्नती व नोकरीतील आरक्षण हे विषय रखडले आहेत. यापूर्वीही ३ नोव्हेंबर २०१८ मध्ये मा.कृष्णा इंगळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली “लोकशाही की पेशवाई” या नावाने संपूर्ण राज्यभर आंदोलन केले होते.

मात्र सध्या महाविकास आघाडीकडून पदोन्नतीच्या निर्णयाबाबत निर्णय घेणे अपेक्षित असताना याही सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व स्थापनेतील पदोन्नत्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. याच्या निषेधार्थ १७ ऑगस्ट २०२० ला घरच्या घरुन पेपर वर मागासवर्गीय पदोन्नती मध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे असे लिहून स्वतःच्या हातात धरलेला फोटो काढून, व्हाट्सअॅप, फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर  वर अपलोड करून धरणे आंदोलन यशस्वी केले आहे. अनुसूचित जाती जमातीचे पदोन्नतीचे आरक्षण हा त्यांचा संवैधानिक हक्क आहे. पण दुर्दैवाने राज्य शासन याविषयी गंभीर नसल्याने सदर आंदोलन करण्यात आले आहे.

कोरोना काळात जमावबंदी असल्याने या आंदोलनात पालघर  जिल्ह्यातील मागासवर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी ,शिक्षक कर्मचारी , महसूल कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी ,कास्ट्राईब संघटनेचे शिलेदार यांनी सोशलमिडीयाच्या माध्यमाने आपला सहभाग घेवून जोरदार प्रतिसाद दिला. तसेच यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा. रविंद्र पालवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली  पालघरचे जिल्हाधिकारी मा. श्री कैलास शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले. सोबत कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्यउपाध्यक्ष मा. नरेंद्र मोरे व जिल्हाध्यक्ष श्री हेमंत कोकणे हे उपस्थित होते.