mahila kisan divas

विक्रमगड : झडपोली येथे महिला किसान दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात उपस्थित महिला शेतकऱ्यांना वेबिनार द्वारे मार्गदर्शन करण्यात आले व प्रगतशील महिलांचा सत्कार करण्यात आला महिलांना गट मार्गदर्शन केले व गटामार्फत केलेले वेगवेगळे उपक्रमाविषयी माहिती सांगितली. तसेच तालुका कृषि अधिकारी आर.यु. ईभाड व

मंडळ कृषि अधिकारी सुनिल पारधी, यांनी कृषि यांत्रिकीकरण, कृषि विभाग योजना, बाबत मार्गदर्शन केले. श्री. कुऱ्हाडा व श्री. वाकले (बीटीएम) यांनी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी विषयी माहिती दिली. . सदर कार्यक्रमास श्रीम. अलका देवरे (समाज सेविका), विवेक निमकर (डायरेक्टर अग्रणी बँक) व महीला शेतकरी उपस्थित होत्या.