christmas

लॉकडाऊन(lockdown) शिथील झाल्यानंतर वसईच्या(vasai) पश्‍चिम पट्ट्यात नाताळची(christmas celebration) जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.  खरेदीसाठी दुकानांमध्ये झुंबड उडत असल्यामुळे कोरोनाचे सावट ओसरल्याचे दिसून येत आहे.

वसई : लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर वसईच्या पश्‍चिम पट्ट्यात नाताळची जोरदार तयारी सुरु(chritstmas celebration started) करण्यात आली आहे.  खरेदीसाठी दुकानांमध्ये झुंबड उडत असल्यामुळे कोरोनाचे सावट ओसरल्याचे दिसून येत आहे.

नऊ महिन्यांच्या विश्रांतीनंतर वसईकर कॅथलिक बांधवांनी नाताळची जोरदार तयारी केली आहे. घरा-घरातून साफसफाई,गोठे तयार करणे,कुमसार,कन्फेक्शन असे कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरु आहेत.सालाबादप्रमाणे यंदाही घरोघरी,आळी,पाडे,गावांमध्ये नाताळगोठे उभारण्यात येत आहेत.सर्वत्र दिव्यांची रोषणाई करण्यात येत असून ग्राहकांसाठी मॉल आणि दुकानेही सजली आहेत.कोरोनाच्या भितीमुळे दिवाळी सणावर मोठा परिणाम झाला होता. फटाके,कंदील,रोषणाई,खरेदी यावर निर्बंध आले होते.नाताळ सणावर मात्र,कोरोनाचे सावट ओसरल्याचे दिसून येत आहे.मागील सालाप्रमाणेच खरेदीसाठी दुकानांवर झुंबड उडत आहे.

christmas beginning

दरवर्षी १ नोव्हेंबरपासून २४ डिसेंबरपर्यंत ख्रिसमस डेकोरेशन साहित्याची विक्री केली जाते. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ग्राहकांचा जास्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनामुळे आम्ही यंदा लवकर सुरुवात केली. सोशल डिस्टन्सिंग ठेवून मास्क घालणार्‍यांना शोरुमध्ये प्रवेश दिला जात आहे. दारावर सॅनिटायजर आणि तापमापक ठेवण्यात आले आहे.

- मॅथ्यु डिमेलो, वाघोलीमधील विक्रेते

ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत असतानाही सोशल डिस्टन्स ठेवून,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाताळगोठे स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. तालुक्यात धर्मग्राम पातळीवर नाताळ गोठे स्पर्धा आयोजित करण्यात येतात. चर्च,जीवन दर्शन केंद्र,विजय पाटील फाऊंडेशन,बिशप हाऊस आणि अवि संघटना यांच्या मार्फत या स्पर्धा आयोजित करण्यात येत होत्या.स्पर्धेत पारितोषिक पटकावण्यासाठी आणि जास्तीत लोकांनी आपला गोठा पाहावा यासाठी चढाओढ लागलेली असते. यंदा या सर्वांनी स्पर्धा रद्द केल्या आहेत.त्यामुळे गोठे बवनण्याचा उत्साह कमी झाला तरी गोठ्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही.

नानभाट तलावाला रोषणाई करून त्यात गोठा बनवणार्‍या अक्करभाट विठारे संघटनेची सजावट पाहण्यासाठी दरवर्षी तुफान गर्दी होत असते.यंदाही या तलावावर नाताळ गोठा बनवण्यात येणार आहे. मात्र,त्यात सध्याच्या परिस्थितीवर चलचित्र बनवण्यात येत आहे. त्याची तयारी सुरु आहे. कोरोनाबाबतची सुरक्षितता,त्यापासून करता येणारा बचाव घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करणारा देखावा तलावावर उभारण्यात येत आहे.

- मार्शल लोपीस, अध्यक्ष,अवि संघटना