पालघरमध्ये भूकंप झालेल्या भागात जिल्हाधिकाऱ्यांची भेट

वाडा: पालघर(palghar) जिल्ह्यात डहाणू – तलासरी भागात भूकंप(earthquake) धक्के चालू आहेत. आजही सकाळी ९.५० वाजता ३.८ व १०.१५ वाजता २.५ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. या भूकंप झालेल्या भागात पालघर जिल्हाधिकारी एम.जी गुरसल यांनी नुकतीच भेट दिली.
या भेटी दरम्यान त्यांनी डहाणूतील कोव्हिड  वेदांत हॉस्पिटल येथे  भेट दिली. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. कोव्हिड पार्श्वभूमीवर जनतेला मास्क वापरण्यास विनंती करा, मग दंडात्मक कारवाई करा असे त्यांनी सांगितले होते.
तसेच भूकंपाच्या उपाययोजनेविषयी बोलताना, त्यांनी भूकंप प्रवण क्षेत्र योग्य असलेली घरे बांधण्यात येतील त्याच बरोबर शबरी योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ देण्यात येईल. त्याचबरोबरीने इथल्या जनतेला होमगार्डकडून भूकंपाच्या वेळी काय करायचे याचे प्रशिक्षण देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी गूरसल यांनी बोलताना सांगितले.
तसेच ते म्हणाले, या भागात या अगोदर सौम्य धक्के जाणवत होते. आता ४ रिश्टर स्केल धक्के जाणवत आहेत. येथे आयआयटी मध्यामातून घरांचे डिझाईन केले जाईल तसेच येथे या अगोदर उन्हाळ्यात उभारलेले तंबू आता पुन्हा उभारण्यात येणार आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.