Earthquake Awareness Campaign will be implemented

ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती, नागरी संरक्षण दल, मॉक ड्रिल, पक्के तंबू आणि दृकश्राव्य माध्यमातून जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. जनजागृतीकरिता दृकश्राव्य आडियो क्लिप तयार करण्यात आली आहे.

विक्रमगड : पालघर (Palghar) जिल्ह्यात सततच्या होणाऱ्या भूकंप (Earthquake) मालिकेने इथला डहाणू तलासरी भाग हादरा बसतोय. भूकंप धक्क्याने भयभीत न होता भूकंप विषयी काही मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या विषयी धुंदल वाडी येथे बैठक झाली. डहाणू,तलासरी तहसील कार्यालय यांच्या कडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. (Earthquake Awareness Campaign)

ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती, नागरी संरक्षण दल, मॉक ड्रिल, पक्के तंबू आणि दृकश्राव्य माध्यमातून जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. जनजागृतीकरिता दृकश्राव्य आडियो क्लिप तयार करण्यात आली आहे.

मोहीम ही आता राबविण्यास सुरुवात

आज शुक्रवारी रात्री पासून ते सकाळ पर्यंत ६ भूकंपाचे धक्के जाणवले.यावर या भागातील प्रशासनाकडून भूकंप विषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. धुंदलवाडी, आंबेसरी, दापचरी,सासवद या सारखी ग्रामपंचायतींना भूकंपाचा मोठा प्रभाव जाणवत असतो. यासाठी डहाणू प्रांताधिकारी अशीमा मित्तल,तहसीलदार राहुल सारंग आदी मान्यवर उपस्थित होते.