परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी प्रत्येक केंद्रावर लस राखीव, हजारो तरुणांच्या जॉबचा मार्ग सुकर

लसीकरणाअभावी जहाजावर जाता येत नसल्यामुळे वसईतील(Vasai) हजारो तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे वृत्त नवराष्ट्रने २१ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते.

  रवींद्र माने, वसई: परदेशात नोकरी(Job Abroad) करणाऱ्यांसाठी प्रत्येक केंद्रावर १५ लसींच्या कोटा राखीव(Reserved Vaccine) ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हजारो तरुणांच्या जॉबचा मार्ग सुकर झाला आहे.

  लसीकरणाअभावी जहाजावर जाता येत नसल्यामुळे वसईतील(Vasai) हजारो तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे वृत्त नवराष्ट्रने २१ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते.त्यावर वसईतील सामाजिक कार्यकर्ते रिक्सन तुस्कानो आणि मार्शल कोरिया ज्यांनी परदेशात नोकरी करणाऱ्या तरुणांना प्राधान्याने लस देण्यात यावी अशी मागणी वसई-विरार महापालिका मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे केली होती.

  परदेशात नोकरी करण्यासाठी जाणाऱ्या तरुणांना लस उपलब्ध व्हावी,यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. तसे वृत्त नवराष्ट्रने प्रसिद्ध केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनीही गांभीर्य ओळखून तात्काळ लस उपलब्ध करून दिल्यामुळे हजारो तरुणांच्या नोकऱ्या वाचल्या.

  -रिक्सन तुस्कानो

  या मागणीचे हजारो ई-मेल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले होते. तुस्कानो आणि कोरिया यांनी लसीकरण अभावी वसईतील हजारो तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दूरध्वनीवरून दिली होती. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोग्यमंत्र्यांनी महापालिकेला तात्काळ आदेश दिले. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर परदेशी नोकरी करणाऱ्यांसाठी १५ लस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच जहाजावर काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या कार्यालयात लस उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही आरोग्य मंत्र्यांनी दिले.

  वसईच्या पश्चिम पट्ट्यातील हजारो तरुण जहाजावर नोकरी करीत आहेत. लाॅकडाऊन पूर्वी ते घरी परतले होते.आता त्यांना पुन्हा नोकरीसाठी शिप वर जाण्याचे कॉल आले आहेत.तत्पुर्वी कोवीड प्रतिबंधात्मक लस घेण्याची अट त्यांना घालण्यात आली आहे.त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून वसईतील सामाजिक कार्यकर्ते रिक्सन तुस्कानो आणि मार्शल कोरिया यांनी महापालिका आयुक्तांकडे शिप वर जाणाऱ्या तरुणांना प्राधान्याने लस देण्यात यावी अशी मागणी केली होती. हीच मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही केली होती. मात्र लस उपलब्ध झाल्यामुळे हजारा तरुणांची जाॅब वाचले आहेत.