Corpse buried in flat wall after killing girlfriend; Boyfred stayed in the same flat for four months

गर्लफ्रेंडची हत्या करुन बॉयफ्रेडने तिचा मृतदेह भिंतीत पुरल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे ज्या फ्लॅटच्या भिंतीत त्याने हा मृतदेह पुरला होता त्याच फ्लॅटमध्ये तो चार महिने राहिला होता. हत्येच्या आरोपाखाली तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पालघर : गर्लफ्रेंडची हत्या करुन बॉयफ्रेडने तिचा मृतदेह भिंतीत पुरल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे ज्या फ्लॅटच्या भिंतीत त्याने हा मृतदेह पुरला होता त्याच फ्लॅटमध्ये तो चार महिने राहिला होता. हत्येच्या आरोपाखाली तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

वाणगाव मधील वृंदावन या सदनिकेतील एका फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. मागील चार महिन्यांपूर्वी उमरोळी येथील अमिता मोहिते ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह करण्यास घरातुन निघून गेली होती. मात्र, ती परत न आल्याने तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली.

या चार महिन्याच काळात तरुणीचा प्रियकर तीचे सोशल मीडिया वापरत असून व्हाट्सएपद्वारे तो तरुणीच्या घरच्यांशी त्यांची मुलगीच असल्याचं भासवून संपर्कात होता. मात्र, तरुणीच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस सदर तरुणाच्या फ्लॅटवर धडकले असता, अमिता त्या घरात आढळून आली नाही.

पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यावर अमिताने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांना प्रियकराने दिली.धक्कादायक बाब म्हणजे फ्लॅट च्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेऊन या तरुणाने स्वतः भिंतीवर बांधकाम केलं . शिवाय तो यांचं फ्लॅट मध्ये चार महिन्यांपासून भाड्यावर रहात होता. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या अधिक तपास सुरू आहे.