complaint to bacchu kadu

विक्रमगड(vikramgad) तालुक्यातील उटावली ग्रामपंचायत(utavali) पेसा निधीच्या कथित गैरव्यवहाराबाबत (corruption)माजी सैनिक तुकाराम महाले यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली आहे.

विक्रमगड : विक्रमगड(vikramgad) तालुक्यातील उटावली ग्रामपंचायत(utavali) पेसा निधीच्या कथित गैरव्यवहाराबाबत (corruption) माजी सैनिक तुकाराम महाले यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली आहे.

याप्रकरणी तुकाराम महाले यांनी अनेक वेळा पंचायत समिती, विक्रमगडच्या गटविकास अधिकारी व पालघर जिल्हा परिषद  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मात्र या तक्रारारीवर कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन या गैरव्यवहाराबाबत चर्चा केली. तसेच कारवाईबाबत निवेदन दिले.

उटावली ग्रामपंचायतीच्या पेसा कमिटीवर मी आहे. ग्रामपंचायतीकडून मला व ग्रामस्थांना क्षेत्रातील विकास कामासाठी व इतर बाबींसाठी खर्च झालेल्या निधीचा हिशोब दिला जात नाही. या निधीत गैरव्यवहार झाल्याची आम्हाला शंका आहे. याबाबत मी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे अनेक वेळा लेखी तक्रार केली आहे. मात्र कुठल्याही प्रकारची दखल किंवा दोषींवर कारवाई झाली नाही.

- तुकाराम महाले, माजी सैनिक व ग्रामस्थ, उटावली

याबाबत तात्काळ हालचाल करत बच्चू कडू यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आठ दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.