marriage hall
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने २० फेब्रुवारीपासून पालघर जिल्ह्यात (palghar district)विविध भागांत कारवाईला सुरुवात झाली आहे. विनामास्क नागरिकांना २०० रुपयांचा दंड(200 rupees fine for not wearing mask) आकारला जात आहे.

    पालघर: कोरोनाचा(corona) वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणी विनामास्क(mask) फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा(action) बडगा उगारला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने २० फेब्रुवारीपासून पालघर जिल्ह्यात (palghar district)विविध भागांत कारवाईला सुरुवात झाली आहे. विनामास्क नागरिकांना २०० रुपयांचा दंड(200 rupees fine for not wearing mask) आकारला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी अचानक भेटी देण्याचे आदेश प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत.

    या आदेशानुसार पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ ,पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे ,सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ किरण महाजन, तहसीलदार सुनील शिंदे, यांच्या विशेष पथकाने काल रात्रीपासूनच कारवाईला सुरुवात केली असून पालघर तालुक्यातील सातपाटी जवळील शिरगांवमधील जलदेवी रिसॉर्ट येथे काल, रविवारी आयोजित लग्न सोहळ्यामध्ये त्यांनी अचानक भेट दिली. यावेळी लग्न सोहळ्यात ५० जणांनी उपस्थित राहण्याचा नियम असताना भरभरून अनेक लोकांची उपस्थिती असल्याने तसेच कोरोना नियमांचे देखील पालन आयोजकांकडून करण्यात आले नसल्याचे दिसून आले.  त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर आणि वर पित्यांसह, रिसॉर्ट , डीजे आणि कॅटरर्सच्या मालकांवर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    शासनाच्या आदेशानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे. पण याला कारणीभूत प्रत्यक्ष परिस्थिती आहे. कारण पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्रात आता कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या अचानक वाढली आहे. मात्र लोक आता कोरोनाविषयक नियम पाळत नाहीयेत. कोरोनाची भीती लोकांच्या मनातून निघून गेली आहे.  कोरोना नियमांत शिथिलता देण्यात आल्यानंतर आत्ता अनेकांचे रोजगार हळूहळू पुर्वपदार येत आहेत. अचानक पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याच्या बातम्या आणि लॉकडाऊन बद्दल होणाऱ्या चर्चेमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे. लग्नसोहळ्यांवर मोठ्या प्रमाणात गदा आली आहे.