अनधिकृत बांधकाम प्रकरण -आता बहुजन विकास आघाडीच्या या मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल

माजी नगरसेवक अरुण जाधव (arun jadhav)पाठोपाठ बहुजन विकास आघाडीच्या(bahujan vikas aghadi) माजी सभापती आणि त्याच्या भाच्यांविरोधात बोगस सिसी वापरून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी एमआरटीपीचा गुन्हा(crime) दाखल झाला आहे.

    वसई: माजी नगरसेवक अरुण जाधव (arun jadhav)पाठोपाठ बहुजन विकास आघाडीच्या(bahujan vikas aghadi) माजी सभापती आणि त्याच्या भाच्यांविरोधात बोगस सिसी वापरून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी एमआरटीपीचा गुन्हा(crime) दाखल झाला आहे.

    बहुजन विकास आघाडीचे नालासोपारातील प्रभाग क्र.५२ चे माजी नगरसेवक यांनी तुळींज येथील सर्वे क्र.९७ मध्ये बोगस सिसीच्या आधारे पार्वतीधाम नावाची इमारत उभारली होती.या प्रकरणी महापालिकेने एमआरटीपी अंतर्गत नोटीस बजावली होती. त्यानंतर तुळींज पोलीस ठाण्यात सीआर.नं.११२१/२०२० कलम ४२०,४६५,४६७,४६८ एमआरटीपी ५२,५३ आणि ५४ अन्वये जाधव यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.त्यामुळे जाधव यांनी इंटरीम जामीन घेतला होता.त्यानंतर वसई न्यायालयात त्यांनी अटकपुर्व जामीनसाठी अर्ज केला होता.तो न्यायालयाने फेटाळून लावला होता.

    जाधव यांनी मौजे मोरे येथील सर्वे क्र.९९ हिस्सा क्र.३ वर सिडकोची बनावट परवानगी दाखवून सिद्धीविनायक आणि सर्वे क्र.९९ हिस्सा क्र.१ मध्ये गणेशधाम नावाची दोन विंगची चार मजली इमारत उभारल्या प्रकरणीही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

    गेल्या कित्येक वर्षांपासून जाधव यांच्या या प्रकरणांमुळे बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे नगरसेवक पद चर्चेत आलेले असताना,आता विरारमधील बविआचा मोठा नेता अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अडचणीत आला आहे. महापालिकेतील तत्कालीन सभापती प्रशांत राऊत यांनी मनवेलपाडा येथील सर्वे क्र. १५६ हिस्सा क्र.१/अ/१ या जागेत शासनाची कोणतीही परवानगी न घेता बनावट कागदपत्रांच्या आधारे साईधाम नावाची इमारत उभारल्याचे प्रकरण श्रेयस म्हात्रे या नागरिकाने उघड केले होते.त्यामुळे या प्रकरणी पालिकेचे सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांच्यातर्फे विजय पाटील यांनी विरार पोलीस ठाण्यात काही दिवसांपुर्वी गुन्हा दाखल केला होता.राऊत यांच्यावर भादवी कलम ४२०,४६७,४७१,३४ आणि एमआरटीपी ५२,५३,५४ कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांच्या भाच्यांवरही या कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.राऊत यांचे भाचे धवल आणि स्वप्नील पाटील यांच्यावर हे गुन्हे दाखल झाले आहेत.

    प्रशांत राऊत हे बहुजन विकास आघाडीचे विरारमधील जेष्ठ नगरसेवक तथा आमदार हितेंद्र ठाकुर यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. अरुण जाधव यांच्यामुळे आघाडीची प्रतिमा मलीन होत असताना,प्रशांत राऊत यांनी ही मलीन प्रतीमा अजूनच गडद केली आहे.