vikramgad crops, farm

विक्रमगड : काल दिवसा व रात्री विक्रमगड व परिसरात मुसळधार पावसाने व विजेच्या गडगडाटेसह सोसाटयाच्या वाऱ्याने शेतामध्ये तयार झालेल्या, कापून ठेवलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

विक्रमगड : काल दिवसा व रात्री विक्रमगड व परिसरात मुसळधार पावसाने(heavy rain in vikramgad area) व विजेच्या गडगडाटेसह सोसाटयाच्या वाऱ्याने शेतामध्ये तयार झालेल्या, कापून ठेवलेल्या हळवे भात पिकाचे मोठे(crops loss) नुकसान झाले आहे. कापणीस आलेले गरवे भातपीक आडवे पडले आहे.

विक्रमगड तालुक्यातील आलोंडे, शिळ, सजन, ओंदे, म्हसरोली, कुरंझे, मलवाडा, व इतर परीसरात मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. शेवटच्या परतीच्या पावसाने ऐन कापणीच्या भातशेतीचे पुरते वाटोळे लावले असून या शेतीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी तालुक्यातील शेतकाऱ्यांनी केली आहे.

सद्यस्थितीत तालुक्यातील काही भागात हलवार शेतीची कापणी सुरु आहे. मुख्य भात शेतीचे हाताशी आलेले भरघोस पीक घरात आणण्याची वेळ आणि काल रात्री झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरीने शेतीची उडविलेली धूळधाण पाहता पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करण्याचे काम या परतीच्या पावसाने केले आहे.
यापरतीच्या पावसाने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे. कालच्या पावसाने अनेकांच्या शेतातील तयार भात पिके खाली आडवी पडली आहेत.  त्यामुळे येथील शेतकरी दिवाळी सण कसा साजरा करणार हा मोठा प्रश्नच आहे. शासनाने त्वरित योग्य ते खबरदारीचे उपाय म्हणून किमान नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे त्वरीत करून घ्यावेत, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

माझ्या शेतात पिकलेले भात पीक मी कापून ठेवले होते. मात्र काल रात्री अचानक आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतात कापलेले भात पीक भिजून अतोनात नुकसान झाले असून भात पिकासाठी केलेला खर्च ही भरून निघणे कठीण आहे.

- पांडुरंग मेथवाले, कुरंझेमधील शेतकरी