crowd at bank in vikramgad

विक्रमगड शहरातील(crowd at vikramgad bank) बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये अनेक नागरिकांनी कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग न पाळता रोजगार हमीचे बँकेतील पैसे काढण्यासाठी बँकेसमोर गर्दी (crowd)केल्याचे दिसून आले.  तसेच बुधवारी भरणारा विक्रमगडचा आठवडी बाजारात सामान खरेदीसाठी तालुक्यातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.

    अमोल सांबरे, विक्रमगड: कोरोनाच्या(corona) भीतीने संपूर्ण देश हादरून गेला आहे. त्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रोजच ग्रामीण भागात कोरोना संसर्ग(corona spread) वाढत असल्याने माणसांच्या जमावावर निर्बंध आणले गेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या सर्व प्रकारातून गेल्या अनेक दिवसांपासुन कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्याबाबत जनजागृती करण्यात येते आहे. मात्र विक्रमगडसारख्या आदिवासी भागामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा कुणाला काही गंधच नाहीये, असे जाणवत ाहे.

    विक्रमगड शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये अनेक नागरिकांनी कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग न पाळता रोजगार हमीचे बँकेतील पैसे काढण्यासाठी बँकेसमोर गर्दी केल्याचे दिसून आले.  तसेच बुधवारी भरणारा विक्रमगडचा आठवडी बाजारात सामान खरेदीसाठी तालुक्यातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. विक्रमगड मधील नागरिकांना नगरपंचायत व पोलिसांकडुन वेळोवेळी सूचना देऊनही नागरिक ऐकत नसल्याचे पहावयास मिळत आहे.

    रोजगार हमीचे पैसे काढण्यासाठी बँकेत तुफान गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा विसर
    विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी, तसेच इतर अनेक कामे मोठ्या प्रमाणात चालू असल्याने तसेच होळी हा सण जवळ आल्याने बँकेतील पैसे काढण्यासाठी नागरिक तुफान गर्दी करत आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार नागरिकांनी १ मीटर किंवा ३ फुटांचं अंतर एकमेकांमध्ये ठेवलं पाहिजे. जेणे करून जर समोरची एखादी व्यक्ती खोंकली किंवा शिंकली तर त्यांच्यातून निघणाऱ्या द्रव्याचा तुम्हाला संसर्ग होणार नाही.

    शासन सध्या सोशल डिस्टन्सिंग करावं यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. कारण त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होऊ शकते. विविध गोष्टी बंद करण्यामागे किंवा सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलण्यामागे सोशल डिस्टन्सिंग करणं हे एकमेव कारण आहे. सोशल डिस्टन्सिंग केल्याने जास्त लोक एकमेकांच्या संपर्कात येत नाही आणि त्यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होऊ शकते. मात्र विक्रमगड तालुक्यातील लोकांना सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.