Crowd on Asheri fort; Forget social distance as soon as restrictions are relaxed

  डहाणू : निर्बंध शिथिल होताच पर्यटकांची पाऊले डहाणूतील आशेरी गडावर वळली आहेत. नुकतीच कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, तर तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांवरील गर्दी ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी ठरेल, असे बोलले जात आहे. पावसाळा सुरू होताच पर्यटकांना गड-किल्ल्यांवर पर्यटनासाठी ओढ लागली आहे. त्यातच निर्बंध शिथिल होताच पर्यटकांची पावलेही पर्यटनस्थळी वळू लागली आहेत. शनिवार, रविवार पर्यटकांनी हजारोच्या संख्येने वाडा खडकोना या गावातील आशेरी गडावर मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.

  शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदीला कैराची टोपली पर्यटकाकडून दाखवविण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. पालघरमधील आशेरी गडावर नागरिकांची हजारोच्या संख्येने तुफान गर्दी करत प्रशासनाने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडविले आहे.

  रविवारची सुट्टी असल्याने हजारोच्या संख्येने पर्यटक पालघरसह मुंबई – ठाणे, गुजरात या मोठ्यास शहरातील हजारो पर्यटक गडावर दाखल झाले. पालघर जिल्हा प्रशासनाकडून झोपेचे सोंग घेतल्याचा चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना पर्यटकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
  रविवारी येथे पर्यटकांचा अक्षरश: मळा फुलला होता. आशेरी गडावर आलेल्या अनेक पर्यटकांनी करोनाचे नियम न पाळताच गडावर प्रवेश केला.

  तर, दुसरीकडे मात्र प्रशासनाकडून मात्र कुठलीही ठोस कारवाईची भूमिका अद्याप नाही. शनिवारी रविवार आशेरी गडावर मौजमजा करण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. यात लहान मुलांचा समावेशदेखील होता. पर्यटनस्थळांवर पर्यटनाला सध्या बंदी नसल्याने सरार्सपणे पर्यटकांच्या गाड्या या पर्यटनाच्या दिशेने निघाल्या आहेत. मात्र या वाढत्या गर्दीमुळे पुन्हा करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. करोनाचे संकट हळूहळू कमी होऊ लागल्याने पर्यटकांचा ओढा हा पर्यटनस्थळी वाढू लागला होता. त्यातच रविवारी पर्यटनस्थळाच्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व इतर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. याला रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे स्थानिक गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  गोराई बीचवरही मोठी गर्दी

  बोरिवली पश्चिमेला असलेल्या गोराई बीचवर रविवार असल्याने फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टशिंगचा पार फज्जा उडाला. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध कमी केले आहेत की, कोरोना संपला आहे, हे काहीच कळत नाही. यावेळी याठिकाणी चौपाटीवर फिरणाऱ्या पर्यटकांनी ना तोंडाला मास्क लावले होते ना कोरोनाच्या कोणत्या नियमाचे पालन केले. यावेळी या चौपाटीवर ना महानगरपालिकेचे अधिकारी होते ना पोलीस उपलब्ध होते. सध्या धबधबे, चौपाट्या, घाटावर शासन प्रशासनाने बंदी लावलेल्या असताना सुद्धा बोरिवलीच्या गोराई चौपाटीवर या सर्व नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे व यावर कुणाचे निर्बंध नाही. लोकांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे संकट डोके वर काढू शकते.

  हे सुद्धा वाचा