Dahanu, Talasari area again shaken by earthquakes; Citizens terrified

जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावे पुन्हा भूकंपाने हादरली(earthquake in palghar). सोमवारी पहाटे दोन्ही तालुक्यातील गावांना सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसले. पहाटे ५.३१ मिनिटांनी व सकाळी १०.१४ मिनिटांनी पुन्हा  बसलेला धक्का ३.४ रिस्टर स्केल क्षमतेचा झाल्याची नोंद झाली आहे.

पालघर : जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावे पुन्हा भूकंपाने हादरली(earthquake in palghar). सोमवारी पहाटे दोन्ही तालुक्यातील गावांना सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसले. पहाटे ५.३१ मिनिटांनी व सकाळी १०.१४ मिनिटांनी पुन्हा  बसलेला धक्का ३.४ रिस्टर स्केल क्षमतेचा झाल्याची नोंद झाली आहे.

धुंदलवाडी, आंबोली, ओसारविरा, कासा, चारोटी, भागात या भूकंपाचा धक्का जाणवला. सतत पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि पुन्हा भूकंपाचा धक्का, यामुळे भीतीच्या वातावरणात भर पडली. भूकंपाच्या जाणवलेल्या धक्क्याने या भागातील नागरिकांच्या समस्येत वाढ झाली.

गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसण्याचे थांबले होते. मात्र, पुन्हा धक्के बसू लागल्याने नागरिक चिंतीत असून आंबोली, दापचरी धुंदलवाडी या भागात बसणारे हादरे आता तलासरी, कासा, उपलाट यामध्ये बसताना दिसून येत आहे. भूकंपाचा केंद्र बिंदू ही नेहमी सरकत असल्याने नागरिकांमध्ये भीती वाढू लागली आहे.