Damage to rice crop due to rains in wada area
हाता तोंडाशी आलेला भात पिकाचा घास पावसाने हिरावला जाणार

  • भात उत्पादक शेतकरी वर्गात चिंता

वाडा (wada) : भात पिके (rice crop) तयार झालीत आणि पावसाचं (rain) संकट यामुळे तयार झालेल्या भात पिकाची कापणी कशी काय करावी आणि कापणीस तयार झालेल्या भात पिकाची नासाडी होईल आणि हाता तोंडाशी आलेला घास हा पावसामुळे हिरावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना (corona) संकट काळात पालघर जिल्ह्यातील (Palghar) शेतकरी (farmers) वर्गाने भात शेती लागवड केली.

हळवे, गरवे या कमी अधिक दिवसाचे भात पिकांची लागवड माळरान आणि खोलगट शेतजमिनीत शेतकरीवर्ग करीत असतो. मात्र या कालावधीत भातपीक तयार झाली आहेत.त्यामुळे भात कापणी करणे गरजेचे बनले आहे. अशातच या भागात मध्यम,जोरदार पाऊस कोसळत असल्याने हाती आलेले भातपीक हे वाया जाईल की काय ? विवचनेत सद्या शेतकरी आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकरीवर्ग मुख्यत्वे भातपिकाचे उत्पादन घेत असतो.

या भात शेती करिता तो नाशिक,तलसारी,डहाणू,जव्हार,मोखाडा या ठिकाणाहून मजुरवर्ग आयात करित असतो.यावर्षी कोरोना काळात मजुरांची कमतरता असताना देखील भातपिकची लागवड आपल्या घरच्या सद्स्य किंवा गावातील मजुर घेऊन लागवड केली.मात्र आज घडीला तयार झालेल्या भात पिकाला पावसाची उसंत हवीय.

भात पिके तयार झालीत आणि पावसाचं संकट यामुळे तयार झालेल्या भात पिकाची कापणी कशी काय करावी आणि कापणीस तयार झालेल्या भात पिकाची नासाडी होईल. आणि हातातोंडाशी आलेला घास हा पावसामुळे हिरावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोना संकट काळात पालघर जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने भात शेती लागवड केली. हळवे, गरवे या कमीअधिक दिवसाचे भात पिकांची लागवड माळरान आणि खोलगट शेतजमिनीत शेतकरीवर्ग करीत असतो.मात्र या कालावधीत भातपीक तयार झाली आहेत.त्यामुळे भात कापणी करणे गरजेचे बनले आहे.

पिकलेले भात पिकाचा दाणा हा जोरदार पावसाने भात पिक पडल्याने तो खराब होण्याची भीती निर्माण होत आहे.त्याचबरोबर त्याचा गवत पेंढा ही खराब होऊन तो जनावराना खाण्या लायक आणि शेतकरी वर्गाला विकुन दोन पैसे मिळणे दुरापास्त होते.जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असल्यामूळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.