dead body 15 hour waiting

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत निलेश भोईर याचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत त्याच्या जन्मदात्या आईचेसुद्धा कोरोनाने पालघर(palghar) येथील कोव्हिड रुग्णालयात निधन झाले. निधन झाल्यावर सुरक्षितरित्या शव गुंडाळणारी कर्मचारीच उपलब्ध नसल्यामुळे भोईर त्यांचा मृतदेह रुग्णालयात पंधरा तास(dead body was kept in the hospital for 15 hours) ताटकळत ठेवण्यात आला होता.

  संतोष चुरी, पालघर : पालघर (palghar)येथील खाजगी कोव्हिड रूग्णालयात कोरोनामुळे अनिता भोईर यांचा मृत्यू झाला.मात्र शव गुंडाळणारे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केल्यानंतर तब्बल पंधरा तासानंतर त्यांना शव देण्यात आले.

  पालघर नगर परिषदेच्या हद्दीत चार ते पाच शासकीय व खाजगी कोव्हिड रुग्णालये असून पालघर नगरपरिषदेसह रुग्णालय प्रशासन व शासकीय आरोग्य विभागाने या कामासाठी कर्मचारी का उपलब्ध केले नाहीत, असा प्रश्न या घटनेनंतर समोर येत आहे.


  विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत निलेश भोईर याचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत त्याच्या जन्मदात्या आईचेसुद्धा कोरोनाने पालघर येथील कोव्हिड रुग्णालयात निधन झाले. निधन झाल्यावर सुरक्षितरित्या शव गुंडाळणारी कर्मचारीच उपलब्ध नसल्यामुळे भोईर त्यांचा मृतदेह रुग्णालयात पंधरा तास ताटकळत ठेवण्यात आला होता.

  नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर नगर परिषद प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. आणीबाणीची स्थिती असताना सभा कोणत्या आधारावर घेणार आहेत. स्वतःच्या अधिकारात त्यांनी कर्मचारी नियुक्त करावा. कोणीही त्यांना नाकारणार नाही तशीच वेळ आली तर मंजुरीही त्या घेऊ शकतात. यासाठी त्यांना नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पण मदत करतील. नगर परिषदेचा कारभार ज्या पद्धतीने चालला आहे. त्यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे.

  - अनिल गावड, सरचिटणीस, पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस

  खाजगी रुग्णालय शासकीय रुग्णालयावर बोट दाखवत होते तर नगरपरिषद प्रशासन खाजगी रुग्णालयावर त्याची जबाबदारी ढकलत होते. नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनासमोर आक्रोश केल्यानंतर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केले. पालघरच्या ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. उमेश डुंपलवार यांना बोलावले. या प्रकरणात त्यांनी हस्तक्षेप करून मृतदेह गुंडाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून अनिता भोईर यांचा शव आरोग्य सुरक्षेत गुंडाळून पंधरा तासांनी नातेवाईकांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांचा आक्रोश शांत झाला.

  कर्मचारी नियुक्ती संदर्भात विषय सभा बोलविण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

  - स्वाती देशपांडे - कुलकर्णी, मुख्याधिकारी, पालघर नगर परिषद

  मृतदेह गुंडाळण्यासाठी कर्मचारी नसणे ही खेदजनक बाब आहे. आधीच मृत रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी अनेक यातना भोगल्या आहेत. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे त्याच यातना मरणानंतरही भोगाव्या लागणे हा निंदनीय प्रकार आहे. कोरोना महामारीच्या संकटात नगर परिषद प्रशासन व त्याचे प्रमुख जबाबदार अधिकारी आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत असतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव नसावे.

  - शिल्पा बाजपयी, नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस

  नगरपरिषदेने काय काम करायचे आहे याची माहिती नगर परिषद प्रशासनाला मिळत नाही. त्यामुळे असे प्रसंग उद्भवल्यावरच प्रशासन जागे होते.

  - लक्ष्मीदेवी हजारी, नगरसेविका, भाजपा

  तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची टाळाटाळ
  दरवेळेस आरोग्य विभागाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत खंडारे यांच्याशी संपर्क साधला असता, “मला काम असून पत्रकारांशी बोलायला बसलो तर माझी कामे तशीच राहतील, माझ्याकडे वेळ नाही”, असेच नेहमी सांगत असतात. हा विषय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गावित त्यांना विचारा असं त्यांनी सांगितले. इतर प्रश्नांसंबंधीसुद्धा त्यांना कधी फोन केला असता ते नेहमी टाळाटाळ करतात.

  फिलिया रुग्णालयात पंधरा तास उलटून गेल्यानंतरही मृतदेह ताब्यात दिला नसल्याने या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. ही बाब नगरपरिषदेच्या पदाधिकारी वर्गाला समजल्यानंतर आरोग्य सभापती अमोल पाटील, गटनेते भावानंद संखे, नगरसेवक सुभाष पाटील असे दिगग्ज मंडळी उपस्थित राहुन कर्मचारी वर्गास पाचारण व जमवाजमव करण्याचा प्रयत्न सुरु केले .

  यावेळी एकमेकांच्या प्रशासनावर आरोप प्रत्यारोप केले.मात्र राजकीय मतभेद विसरून या काळात सर्वांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे काहींनी सांगितले आहे.