ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम लोकलसेवा वाहतुकीचा खोळंबा

ओव्हरहेड वायर तुटल्यानंतर नालासोपारा रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रम ३ आणि ४ च्या रेल्वे ट्रॅक वरील लाईन बंद करुन १ व २ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर सोडण्यात आल्या आहेत. ओव्हरहेड वायर तुटल्यानं याचे काम दुरुस्थी पथकाने युद्धपातळीवर पुर्ण केले आहे.

नालासोपारा : पश्चिम रेल्वेचे सर्वात जास्त वर्दळीचे रेल्वे स्थानक असलेल्या नालासोपारा रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Nalasopara) क्रमांक ४ जवळील ओव्हरहेड वायर (overhead wire) तुटल्यानं काही वेळ येथील लोकल सेवा वाहतुक विस्कळीत झाली होती. मात्र पश्चिम रेल्वेच्या ( western Railway) कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु केल्याने या लोकलसेवा काही वेळातच सुरु करण्यास यश आले आहे. यामुळे संबंधित मार्गावरील लोकलसेवा सुरु झाली आहे.

ओव्हरहेड वायर तुटल्यानंतर नालासोपारा रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रम ३ आणि ४ च्या रेल्वे ट्रॅक वरील लाईन बंद करुन १ व २ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर सोडण्यात आल्या आहेत. ओव्हरहेड वायर तुटल्यानं याचे काम दुरुस्थी पथकाने युद्धपातळीवर पुर्ण केले आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलसेवा सुरु आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाला परवानगी दिली नाही आहे.