dhamani dam

पालघर जिल्ह्यातील पाण्याचा स्त्रोत(Water Source Of Palghar District) असलेले धामणी धरण ओव्हरफ्लो (Dhamani Dam Overflow)झाले आहे. आठवडाभर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे (Rain)धामणी धरण पूर्णपणे भरल्याने धरणाचे ३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

    पालघर : पालघर(Palghar) जिल्ह्यावासीयांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पालघर जिल्ह्यातील पाण्याचा स्त्रोत(Water Source Of Palghar District) असलेले धामणी धरण ओव्हरफ्लो (Dhamani Dam Overflow)झाले आहे. आठवडाभर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे (Rain)धामणी धरण पूर्णपणे भरल्याने धरणाचे ३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे कवडास बंधाऱ्यामध्ये १२७१ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे सूर्या आणि वैतरणा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    गेल्या वर्षी १६ ऑगस्टला धरण भरले होते. यावर्षी मात्र सूर्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील अनियमित पावसामुळे धरण पूर्ण भरण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत २० दिवसांचा अधिक कालावधी लागला. त्यामुळे या धरणातील पाण्यावर अवलंबून असणारे डहाणूपासून वसईपर्यंतचे लाखो नागरिक, उन्हाळी शेती करणारे शेतकरी तसेच तारापूर-वसईमधल्या हजारो उद्योगांच्या आगामी काळात होणाऱ्या पाणीकपातीच्या शक्यतेने तोंडचे पाणी पळाले होते. मात्र गेल्या आठवड्यापासूनच धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने आधीची सर्व कसर भरून काढत धामणी धरण तुडुंब भरल्याने पालघरला दिलासा मिळाला आहे.

    धामणी धरणाची पूर्ण संचय पातळी ११८.६० मीटर असून आजच्या दिवशी पाणी पातळी ११८.४० मीटरवर पोचली आहे. धरणाचा एकूण उपयुक्त पाणीसाठा २७६.३५० दलघमी असून आजच्या दिवशी धरणात एकूण २७३.७५९ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. धामणी धरणातून विसर्ग करण्यात येणारे पाणी खालच्या बाजूस असलेल्या कवडास बंधाऱ्यामध्ये जमा होते आणि तिथून नंतर सूर्या नदीपात्रात सोडण्यात येते.

    सूर्या प्रकल्पाअंतर्गत धामणी आणि कवडास या धरणातून डहाणू नगर परिषद, वाणगाव परिसर, बोईसर, पालघर नगर परिषद, सफाळे आणि वसई-विरार महानगरपालिका इत्यादी ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो.तसेच रब्बी हंगामात डहाणू आणि पालघर तालुक्यात शेतीला पाणीपुरवठा केला जातो. डहाणू येथील अदानी औष्णिक ऊर्जा प्रकल्प, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, तारापूर एमआयडीसी हे सगळे धामणी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे.