बनावट ई-पास बनवणाऱ्या भामट्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचं जिल्हाधिका-यांचं आवाहन

  • जिल्हयात काही लोकांकडून नागरीकांना ई-पास मिळवून देण्याच्या नावानं अमिष दाखविलं जातं. अशाच एका प्रकरणात जिल्ह्यातल्या नालासोपारा इथल्या गणेश झेरॉक्स सेंटर आणि रामदेव झेरॉक्स सेंटर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलयं. त्यामुळे जनतेनं बनावट ई-पास बनवणाऱयां पासून सावध रहावं असं अवाहन जिल्हाधिकारी शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे.

पालघर : शासनानं कोव्हिड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनच्या काळात जिल्हयात अडकलेल्या स्थालांतरीत कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर नागरिकांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन ई-पास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिले जातात. आणि त्यासाठी ऑनलाईन ई-पास नोंदणी सुविधा Covid19.mhpolice.in या लिंक वर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 

मात्र जिल्हयात काही लोकांकडून नागरीकांना ई-पास मिळवून देण्याच्या नावानं अमिष दाखविलं जातं. अशाच एका प्रकरणात जिल्ह्यातल्या नालासोपारा इथल्या गणेश झेरॉक्स सेंटर आणि रामदेव झेरॉक्स सेंटर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलयं. त्यामुळे जनतेनं बनावट ई-पास बनवणाऱयां पासून सावध रहावं असं अवाहन जिल्हाधिकारी शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे.

या गुन्हयाच्या अनुषंगानं पोलीस यंत्रणेमार्फत पुढील तपास चालु आहे. तर रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हयात जाण्यासाठी बोगस पास दिल्या बाबतच्या घटना निदर्शनास आल्यानं या दोन्ही प्रकरणात चौकशी करुन कारवाई करण्या बाबतच्या सुचना पालघरच्या पोलीस अधिक्षकांना देण्यात आल्यात. त्यामुळे ऑनलाईन ई-पास मिळण्यासाठी कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये. तसचं  ई-पास मिळवून देण्याबाबत कोणी संपर्क केल्यास अथवा त्याकामासाठी कोणत्याही प्रकारची मागणी केल्यास संबंधित पोलीस स्टेशनला किंवा तहसिल कार्यालयला कळवावं असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे.